मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suniel Shetty: गर्लफ्रेंडमुळे सलमान खानला मागावी लागली होती सुनील शेट्टीची माफी

Suniel Shetty: गर्लफ्रेंडमुळे सलमान खानला मागावी लागली होती सुनील शेट्टीची माफी

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 11, 2023, 07:30 AM IST

    • Suniel Shetty Birthday: आज ११ ऑगस्ट रोजी सुनील शेट्टीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…
Suniel Shetty

Suniel Shetty Birthday: आज ११ ऑगस्ट रोजी सुनील शेट्टीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…

    • Suniel Shetty Birthday: आज ११ ऑगस्ट रोजी सुनील शेट्टीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकत असतो. त्याने आजवर तामिळ, तेलुगू, इंग्रजी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. ९०चे दशक सुनील शेट्टीने गाजवले होते. आज, ११ ऑगस्ट रोजी सुनील शेट्टीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

सुनिल शेट्टीचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी कर्नाटकमध्ये झाला होता. त्याने १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बलवान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत दिव्या भारतीने स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटानंतर सुनीलला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्याने दिलवाले, अंत, मोहरा, गोपी किशन, धड़कन, सपूत, रक्षक, बॉर्डर, भाई, ये तेरा घर ये मेरा घर, वेलकम, फिर हेरा फेरी, कैश, रुद्राक्ष आणि भागमभाग यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले.

सुनील शेट्टीने चित्रपटसृष्टीमधील करिअर दरम्यान अनेक चांगले मित्र-मैत्रिणी कमावले. सलमान आणि त्याची मैत्रिची तर कायम चर्चा असायची. मात्र एका सलमान खानला सुनील शेट्टीची माफी लागली होती. १९९२ साली बलवान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर सुनिल शेट्टीला सलमान खानची त्यावेळची गर्लफ्रेंड सोमी अलीसोबत एक चित्रपटाची ऑफर आली होती. मात्र त्यावेळी सुनील शेट्टीने सोमी अलीसोबत तो चित्रपट करण्यास स्पष्ट नकार दिला होता. सोमी ही चित्रपटसृष्टीत नवीन आहे, असे कारण सुनिल शेट्टीने त्यावेळी दिले होते. विशेष म्हणजे त्यावेळी सोमीची बॉलिवूडमध्ये फक्त सलमान खानची गर्लफ्रेंड अशीच ओळख होती.

त्यानंतर १९९४ मध्ये पुन्हा 'अंत' या चित्रपटासाठी सुनिल शेट्टी आणि सोमी अलीचे कास्टिंग करण्यात आले होते. मात्र, सुनीलने नकार दिला. त्यामुळे निर्मात्यांनी सोमीच्या जागी दुसरी अभिनेत्री घेण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्या प्रकरणात सलमानने मध्यस्थी केली होती. त्याने सुनीलची माफी मागितली होती. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सुपरहिट ठरला.

विभाग

पुढील बातम्या