मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suniel Shetty: टोमॅटो दरवाढ वक्तव्याप्रकरणी अभिनेता सुनील शेट्टीला मागावी लागली माफी! म्हणाला...

Suniel Shetty: टोमॅटो दरवाढ वक्तव्याप्रकरणी अभिनेता सुनील शेट्टीला मागावी लागली माफी! म्हणाला...

Jul 19, 2023, 10:48 AM IST

  • Suniel Shetty On Tomato Price Hike: सुनील शेट्टी याने नकळत शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे.

Suniel Shetty

Suniel Shetty On Tomato Price Hike: सुनील शेट्टी याने नकळत शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे.

  • Suniel Shetty On Tomato Price Hike: सुनील शेट्टी याने नकळत शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे.

Suniel Shetty On Tomato Price Hike: टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किंमतीची चर्चा सर्वसामान्य कुटुंबापासून ते बॉलिवूड स्टार्सच्या कुटुंबापर्यंत सर्वत्र होत आहे. सोशल मीडियावर जणू टोमॅटोवरच चर्चा रंगली आहे. दरम्यान अभिनेता सुनील शेट्टीनेही टोमॅटोच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता व्यक्त करत टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम त्याच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे, त्यामुळे तो टोमॅटो कमी खायला लागला आहे, असे म्हटले होते. मात्र, आता सुनील शेट्टीचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. काही लोक त्यांच्यावर शेतकरी विरोधी असल्याचा ठपका ठेवत, शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत होते. अखेर सुनील शेट्टी याने याप्रकरणी माफी मागितली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

सुनील शेट्टी याने नकळत शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे. अभिनेत्याने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्याच्या बोलण्याचा लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. आपण नेहमीच शेतकऱ्यांना साथ देत आलो आहोत आणि त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करण्याची कल्पनाही करू शकत नाही. सुनील शेट्टी म्हणाला की, त्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काम केले असून, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर लाभ मिळेल, अशी त्याची इच्छा आहे.

Farhan Akhtar: १६ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; लेकीच्या ग्रॅज्युएशन सोहळ्याला पुन्हा एकत्र दिसले फरहान-अधुना!

पुढे सुनील शेट्टी याने असे देखील म्हटले की, आपला हॉटेल व्यवसाय असल्याने शेतकरी नेहमीच त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत आणि त्यांच्याशी त्याचा थेट संबंध आहे. माफी मागताना सुनील शेट्टी पुढे म्हणाला की, 'मी कुठल्याच वाईट हेतूने काहीही बोललो नाही. मात्र, तरीही त्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. शेतकऱ्यांच्या विरोधात बोलण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. कृपया माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावू नका.’

काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी याने टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य करताना म्हटले होते की, त्याची पत्नी ताजी भाजी खायला मिळावी म्हणून एकावेळी फक्त २-३ दिवसांची भाजी खरेदी करते. पण, टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किंमतीचा परिणाम आता त्याच्या स्वयंपाकघरावरही होत असल्याचे देखील म्हटले होते. भाव वाढल्यामुळे आजकाल आमच्या घरातही टोमॅटो कमी खाल्ले जात आहेत, असे त्याने म्हटले होते.

विभाग

पुढील बातम्या