मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Subodh Bhave: दहावीत असताना प्रपोज केले अन्...; जाणून घ्या सुबोध भावेची लव्हस्टोरी

Subodh Bhave: दहावीत असताना प्रपोज केले अन्...; जाणून घ्या सुबोध भावेची लव्हस्टोरी

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 09, 2022, 06:28 PM IST

  • Subodh Bhave Love Story: सुबोधच्या पत्नीचे नाव मंजिरी आहे. ते जवळपास ३० वर्षे एकत्र आहेत.

सुबोध भावे (HT)

Subodh Bhave Love Story: सुबोधच्या पत्नीचे नाव मंजिरी आहे. ते जवळपास ३० वर्षे एकत्र आहेत.

  • Subodh Bhave Love Story: सुबोधच्या पत्नीचे नाव मंजिरी आहे. ते जवळपास ३० वर्षे एकत्र आहेत.

Subodh Bhave Love Story: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे सुबोध भावे. त्याने आजवर अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज सुबोधचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. सुबोधच्या पत्नीचे नाव मंजिरी आहे. त्यांनी प्रेमविवाह केला आहे. पण त्यांची ओळख कशी झाली? लग्न कधी झालं हे जाणून घेऊया..

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

सुबोध आणि मंजिरी शालेय दिवसांपासून एकाच नाट्य संस्थेत जात होते. मात्र दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. १९९१ साली सुबोधने दहावीत असताना मंजिरीला प्रपोज केले. पण त्यावर मंजिरीने दिलेल्या उत्तराने मात्र हटके अंदाजात उत्तर दिले.

एका मुलाखतीमध्ये सुबोध आणि मंजिरीने त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती. त्यावेळी सुबोधने मंजिराला दहावीत असताना प्रपोज केल्याची कबूली दिली. त्यावर मंजिरीने हटके अंदाजात उत्तर दिले. मंजिरी म्हणाली, "मी सुबोधला म्हणाले की बालगंधर्वच्या पुलावर ठराविक वेळेला आले तर हो समज.. त्यानंतर मी त्यावेळेला पुलावर गेले.. तेव्हापासून आमचं नातं सुरू झालं."

२००१ साली सुबोध आणि मंजिरी लग्नबंधनात अडकले. ते जवळपास गेली ३० वर्षे एकत्र आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांची नावे मल्हार आणि कान्हा अशी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. सुबोधने खास अंदाजात मंजिराला शुभेच्छा दिल्या होत्या.

विभाग

पुढील बातम्या