मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Subodh Bhave: देशभरात घुमणार शिवगर्जना, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे

Subodh Bhave: देशभरात घुमणार शिवगर्जना, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 06, 2022, 01:18 PM IST

    • Har Har Mahedev: या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित होणार आहे.
हर हर महादेव (HT)

Har Har Mahedev: या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित होणार आहे.

    • Har Har Mahedev: या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित होणार आहे.

'हर हर महादेव' या भव्य दिव्य चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील आणि मुख्य म्हणजे यात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. नुकतंच या चित्रपटाचं डिजीटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून याद्वारे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

मराठीतील हरहुन्नरी आणि बहुआयामी अभिनेता अशी ओळख असलेला सुबोध भावे 'हर हर महादेव' या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची ख्याती आणि कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पसरलेली आहे. देशभरातील लोकांसाठी आजही शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. येत्त्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे हे विशेष.

हर हर महादेव चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यातील एक प्रमुख भूमिकेतील नाव म्हणजे सुबोध भावे. या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचं उर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे असे मी मानतो."

पुढे तो म्हणाला, "एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानत्मक भूमिका करायला मिळाव्यात अशी कायम इच्छा असते. माझ्यासाठी ‘ड्रीम रोल’ असलेली ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मला आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचा मी इमानेइतबारे प्रयत्न केलेला आहे. दिवसाअंती आनंद आणि समाधान देणाऱ्या काही भूमिका असतात. या भूमिकेने मला तो आनंद ते समाधान आणि जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन दिलाय. अभिजित देशपांडेचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, अतिशय बंदिस्त पटकथा आणि झी स्टुडिओजमुळे लाभलेलं दर्जेदार निर्मितीमूल्य यांनी सज्ज झालेला हर हर महादेव हा चित्रपट मराठीसह इतर भाषांमधूनही प्रदर्शित होणार असल्याने आनंद द्विगुणीत झालेला आहे.”

विभाग

पुढील बातम्या