मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Subodh Bhave:राजकारण्यांची लायकी काढणाऱ्या 'त्या' वक्तव्यावर सुबोध भावेचा खुलासा

Subodh Bhave:राजकारण्यांची लायकी काढणाऱ्या 'त्या' वक्तव्यावर सुबोध भावेचा खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 02, 2022, 07:43 PM IST

    • एका कार्यक्रमात सुबोध भावेने 'लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम' असे म्हटले होते. त्यानंतर आता या कार्यक्रमातील संपूर्ण व्हिडीओ शेअर करत त्याने खुलासा केला आहे.
सुबोध भावे (HT)

एका कार्यक्रमात सुबोध भावेने 'लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम' असे म्हटले होते. त्यानंतर आता या कार्यक्रमातील संपूर्ण व्हिडीओ शेअर करत त्याने खुलासा केला आहे.

    • एका कार्यक्रमात सुबोध भावेने 'लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम' असे म्हटले होते. त्यानंतर आता या कार्यक्रमातील संपूर्ण व्हिडीओ शेअर करत त्याने खुलासा केला आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यातिथी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुबोधने आपले मत मांडले होते. त्यावेळी त्याने देशातील सद्य परिस्थितीवर परखड पणे वक्तव्य करत 'लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम' असे म्हटले होते. पण आता सुबोध भावेने 'काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे.त्याचा हा संपूर्ण व्हिडीओ' असे म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

सुबोधने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, "नमस्कार, काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे.त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ. (कुठेही कट न करता जसाच्या तसा) आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची" असे म्हटले आहे.

पुढे तो म्हणाला, 'माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा "संपूर्ण भाषण" त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.'

काय म्हणाला होता सुबोध भावे?

भर सभेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना तो म्हणाला, 'आपण सर्वजण चांगलं शिक्षण घेऊन करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशात जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे. राजकारण्यांच्या हातात देश देऊन काही होणार नाही. ते काय करतात, हे आपल्या समोर आहेच' या शब्दात त्याने देशातील राजकारणावर टीका केली आहे. देश निर्मितीसाठी पुढील पिढीमध्ये शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल असं मत त्याने बोलताना व्यक्त केलं.

सोबतच राज्यपालांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत सुबोध म्हणाला, 'इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावेत म्हणून आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. शिक्षणाला महत्व दिलं. आजही आपण ती पाळत आहोत. म्हणूनच मुंबईतून काही लोक निघून गेले तर इथे पैसेच उरणार नाहीत असं वक्तव्य करण्याची काही राजकारण्यांची हिम्मत होते. हल्ली आपण मुलांना हिंदी, मराठी गाण्यांवर नाचायला सांगतो. एखाद्या चित्रपटातील संवाद त्यांना सर्वांसमोर सादर करायला सांगतो. पुष्पा चित्रपटातील संवादांच्या सादरीकरणाचं तर खूळ आलं आहे. हे करून देश घडणार नाही. याऐवजी जर या मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले, तर त्यांच्यात देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल.' अशा शब्दात सुबोधने आपलं मत मांडत सगळ्या परिस्थितीवर घणाघाती टीका केली.

विभाग

पुढील बातम्या