मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Subodh Bhave: 'हँडसम हंक' सुबोध भावे किती वर्षांचा झाला माहीतेय?

Subodh Bhave: 'हँडसम हंक' सुबोध भावे किती वर्षांचा झाला माहीतेय?

Nov 09, 2022, 11:31 AM IST

  • Subodh Bhave Birthday: आज अभिनेता सुबोध भावे त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. ९ नोव्हेंबर १९७५ रोजी पुण्यात त्याचा जन्म झाला.

Subodh Bhave

Subodh Bhave Birthday: आज अभिनेता सुबोध भावे त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. ९ नोव्हेंबर १९७५ रोजी पुण्यात त्याचा जन्म झाला.

  • Subodh Bhave Birthday: आज अभिनेता सुबोध भावे त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. ९ नोव्हेंबर १९७५ रोजी पुण्यात त्याचा जन्म झाला.

Subodh Bhave Birthday: मालिका विश्व असो, नाटकाचा रंगमंच असो वा चित्रपटाचा मोठा पडदा, आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणून सुबोध भावेचं नाव घेतलं जातं. आज अभिनेता सुबोध भावे त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. ९ नोव्हेंबर १९७५ रोजी पुण्यात त्याचा जन्म झाला. आपल्या चतुरस्र भूमिकांमधून त्याने मनोरंजन विश्वात स्वतःची एक हक्काची जागा निर्माण केली. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्याच्या काही चर्चित चित्रपटांवर नजर टाकूया...

ट्रेंडिंग न्यूज

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

सनई चौघडे: सुबोध भावे याचा ‘सनई चौघडे’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. लग्न जुळवण्याची एक हटके संकल्पना या चित्रपटात दाखवण्यात आली होती. एक मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या व्यक्तीची भूमिका यात सुबोध भावेने साकारली होती. या चित्रपटात सुबोध भावेसोबत सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, तुषार दळवी, भारती आचरेकर या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

बालगंधर्व: ‘बालगंधर्व’ या चित्रपटाने मराठी चित्रपटाच्या इतिहासात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावेने ‘बालगंधर्व’ यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्यांनी स्त्री वेशात काम केले होते. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची भरपूर वाहवा मिळवली. प्रत्यक्ष बालगंधर्व भासावे इतकी मेहनत सुबोध भावेने या चित्रपटासाठी घेतली होती.

लोकमान्य एक युगपुरुष: बायोपिकचा बादशहा अशी ख्याती मिळवलेल्या सुबोध भावेने ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटात लोकमान्य टिळक यांची भूमिका साकारली होती. सुबोधच्या बहरदार अभिनयाने ‘युगपुरुषा’ला मानवंदना देणारी कलाकृती साकार झाली. या चित्रपटासाठी सुबोध भावेने विशेष मेहनत घेतली होती. टिळकांची करारी नजर, त्यांची देहबोली समजून घेण्यासाठी प्रचंड अभ्यास केला. वेळप्रसंगी टिळक कुटुंबीयांची भेट देखील घेतली.

तुला कळणार नाही: सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातून एक वेगळीच कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. लग्नाच्या नात्यात कटुता आल्यावर वेगवेगळ्या दिशेने प्रवासाला निघालेल्या व्यक्ती शेवटी पुन्हा एकदा एकाच ठिकाणी भेटतात आणि नव्याने त्यांच्या नात्याची सुरुवात करतात. या प्रवासात त्यांना एकमेकांचं महत्त्व पटवून देणाऱ्या अनेक गोष्टी कशाप्रकारे घडतात, हे पाहणं मनोरंजक आहे.

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर : अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाने मारतही मनोरंजन विश्वात केवळ वाहवा मिळवली नाही तर, बॉक्स ऑफिसवरही चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर साकारले होते.

हर हर महादेव : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटात सुबोध भावेने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

विभाग

पुढील बातम्या