मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vijay Deverakonda: ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये विजय देवरकोंडाची एन्ट्री? ‘या’ भूमिकेत झळकण्याची चर्चा

Vijay Deverakonda: ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये विजय देवरकोंडाची एन्ट्री? ‘या’ भूमिकेत झळकण्याची चर्चा

Nov 08, 2022, 01:59 PM IST

  • Vijay Deverakonda: ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करणारा अभिनेता विजय देवरकोंडा आता ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Vijay Deverkonda

Vijay Deverakonda: ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करणारा अभिनेता विजय देवरकोंडा आता ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • Vijay Deverakonda: ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करणारा अभिनेता विजय देवरकोंडा आता ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Vijay Deverakonda: साऊथ चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर अभिनेता विजय देवरकोंडा याने ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण केलं. मात्र, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. मात्र, आता अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय देवरकोंडा आता ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये (Brahmastra 2) झळकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात विजय देवरकोंडाची एन्ट्री होणार असल्याचे ऐकताच त्याचे चाहते देखील उत्साहित झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) या जोडीचा ‘बह्मास्त्र १’ म्हणजेच ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या चित्रपटावर काम सुरु झालेले नसले, तरी पहिल्या चित्रपटाला मिळाले यश पाहता दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

‘ब्रह्मास्त्र पार्ट टू: देवा’साठी मेकर्स सध्या नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये ‘देव’ची भूमिका कोण करणार याची चर्चा सध्या सुरू आहे. 'ब्रह्मास्त्र २'मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत 'KGF' स्टार यश झळकणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, निर्माता करण जोहरने हे वृत्त फेटाळून लावले होते. आता निर्मात्यांनी या चित्रपटासाठी ‘लायगर’ फेम अभिनेता विजय देवरकोंडा याला निवडल्याचे म्हटले जात आहे. तर, या चित्रपटातील ‘देव’च्या पात्रासाठी विजय देवरकोंडाला विचारणा झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप निर्माते किंवा अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

अभिनेता विजय देवरकोंडा याचा 'लायगर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नव्हता. तर, बॉलिवूड पदार्पण फ्लॉप ठरल्यामुळे त्याला करण जोहर मदतीचा हात देऊ पाहतोय, असे म्हटले जात आहे. करण जोहर आणि विजय देवरकोंडाला सुपरहिट ठरणाऱ्या एखाद्या प्रोजेक्टवर एकत्र काम करायचे आहे, ज्यामुळे विजयच्या बॉलिवूड प्रवासाला देखील मदत होण्याची शक्यता आहे. आता विजय देवरकोंडा याने हा चित्रपट करण्यास होकार दिल्यास हा त्याचा पॅन इंडिया चित्रपट ठरेल आणि साऊथमधील प्रेक्षक देखील या चित्रपटाला लाभतील, असे म्हटले जात आहे. मात्र, काही सूत्रांनी अशी कोणतीही विचारणा झाली नसल्याचे म्हणत, सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

विभाग

पुढील बातम्या