मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashadhi Wari: ‘कैवल्य वारी’ भक्तिगीतांच्या अल्बमचे पुण्यात प्रकाशन

Ashadhi Wari: ‘कैवल्य वारी’ भक्तिगीतांच्या अल्बमचे पुण्यात प्रकाशन

HT Marathi Desk HT Marathi

Jul 02, 2022, 09:53 PM IST

    • आषाढी वारीनिमित्त ‘कैवल्य वारी’ या भक्तिगीतांचा अल्बम नुकताच पुण्यात प्रकाशित करण्यात आला. वारी सोहळ्यातील महत्वाच्या टप्प्यांचे वर्णन करणाऱ्या भक्तिगीतांचा यात समावेश आहे.
‘कैवल्य वारी’ अल्बम प्रकाशित

आषाढी वारीनिमित्त ‘कैवल्य वारी’ या भक्तिगीतांचा अल्बम नुकताच पुण्यात प्रकाशित करण्यात आला. वारी सोहळ्यातील महत्वाच्या टप्प्यांचे वर्णन करणाऱ्या भक्तिगीतांचा यात समावेश आहे.

    • आषाढी वारीनिमित्त ‘कैवल्य वारी’ या भक्तिगीतांचा अल्बम नुकताच पुण्यात प्रकाशित करण्यात आला. वारी सोहळ्यातील महत्वाच्या टप्प्यांचे वर्णन करणाऱ्या भक्तिगीतांचा यात समावेश आहे.

पुणे

ट्रेंडिंग न्यूज

'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या", सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

आषाढी वारीनिमित्त ‘कैवल्य वारी’ या भक्तिगीतांचा अल्बम नुकताच पुण्यात माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. आषाढी वारी सोहळ्यातील महत्वाच्या टप्प्यांचे वर्णन करणाऱ्या दहा भक्तिगीतांचा समावेश या अल्बममध्ये आहे. (Songs on Ashadhi Wari)

याप्रसंगी बोलताना उल्हास पवार म्हणाले, ‘कैवल्य वारी’ अल्बममध्ये प्रासंगिक आणि रसाळ गीतांचा समावेश आहे. यातील संतांच्या पालखीच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील अर्थ, भावना, स्वरांमध्ये अंतरमनाला भिडणारे सामर्थ्य आहे. संतांच्या पालखी प्रस्थानापासून पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत वारी मार्गावर प्रत्येक टप्प्याला महत्व आणि मुक्कामाला अर्थ आहे. तुकोबांच्या अभंगात सर्व विषय सामावलेले आहेत. त्यात संगीत, गायनाचा समावेश आहे. अशा संतांच्या पालखी सोहळ्यातील वातावरण, प्रसंग या अल्बमच्या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.’

पुण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, धवल आपटे, पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, संगीत संयोजक कमलेश भडकमकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, ‘विठ्ठल नादब्रम्ह आहे. या नादातून भक्तच विठ्ठलाकडे एकरुप होऊ शकतात. या अल्बममधील काव्यात जीव ओतून गायन व संगीतकाराने जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. अल्बमधील शब्द गायनाने अंतर्मुख केले आहे. काव्यात गोडवा असून, सुंदर आहेत.’

महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘पालखी सोहळ्यात नसतानाही या गाण्यातून पालखीसोबत पंढरपूरला जात असल्याची अनुभूती मिळते. या वारीत सर्व प्रवास आपण या गाण्यातून अनुभवता येत असून, हे भाग्य म्हणावे लागेल.’

सुरेश वाडकर, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे, कार्तिकी गायकवाड, शमिका भिडे, अवधूत गांधी, विलास कुलकर्णी यांनी या अल्बममधील भक्तीगीते गायली आहेत. तर कल्याणजी गायकवाड यांनी संगीत दिले आहे. श्रिया क्रिएशनद्वारे निर्मित या अल्बममधील गीतरचना वर्षा राजेंद्र हुंजे यांची आहे.

 

पुढील बातम्या