मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tararani: मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार मोगलमर्दिनी ‘छत्रपती ताराराणी’, टीझर प्रदर्शित

Tararani: मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार मोगलमर्दिनी ‘छत्रपती ताराराणी’, टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 04, 2023, 11:19 AM IST

    • Mogalmardini Chatrapati Tararani: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ताराराणी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
छत्रपती ताराराणी (HT)

Mogalmardini Chatrapati Tararani: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ताराराणी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

    • Mogalmardini Chatrapati Tararani: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ताराराणी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होय. ज्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुनेदेखील केले, ज्यांची राजनीति आणि रणनीती इतिहासकारांनी गौरविली, बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक पुत्री, सून, पत्नी, माता तसेच राजस्त्री या भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे जीवनचरित्र 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ओठ सुजले अन् चेहराही बिघडला; छोट्या पडद्यावरच्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला पाहून सगळ्यांनाच बसला धक्का!

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या ग्रंथावर आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. नुकतेच याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे.
वाचा: एकेकाळी चहासाठी पैसे नसलेली पोरं आज कमावतात लाखो रुपये, वाचा नील-करणची यशोगाथा

टिझर मध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढय शत्रूविरुद्ध त्यांचे नेतृत्व करत आहे.

पुढील बातम्या