मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade Video: हार्ट अटॅक येण्याआधी काय करत होता श्रेयस तळपदे? व्हिडीओ आला समोर

Shreyas Talpade Video: हार्ट अटॅक येण्याआधी काय करत होता श्रेयस तळपदे? व्हिडीओ आला समोर

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 16, 2023, 02:53 PM IST

    • Shreyas Talpade Video before Heart Attack: ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटासाठी श्रेयस आणि अक्षय सोबत शूटिंग करत होते. या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ अक्षयने पोस्ट केला होता.
Shreyas Talpade

Shreyas Talpade Video before Heart Attack: ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटासाठी श्रेयस आणि अक्षय सोबत शूटिंग करत होते. या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ अक्षयने पोस्ट केला होता.

    • Shreyas Talpade Video before Heart Attack: ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटासाठी श्रेयस आणि अक्षय सोबत शूटिंग करत होते. या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ अक्षयने पोस्ट केला होता.

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर घरी परतल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. पत्नीला कळताच तिने अंधेरीमधील बेलेव्यू रुग्णालयात त्याला दाखल केले. रात्री १० वाजता श्रेयसवर अँजियोप्लास्टी करण्यात आली. आता हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस काय करत होता याचा व्हिडीओ समोर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

श्रेयस हा ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसोबत काम करत आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार, अर्षद वारसी, कृष्णा अभिषेक, श्रेयस तळपदे हे एक कॉमेडी सीन शूट करताना दिसत आहेत. एकीकडे अक्षय, अर्षद आणि कृष्णासोबत इतर कलाकार एका उंचावर सीन शूट करत आहेत, तर दुसरीकडे काही कलाकारांसोबत श्रेयस शिडीने वर चढताना दिसतोय. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: क्रांती की शुरुवात होती है हँगओवर से; श्रिया पिळगावकरच्या 'ड्राय डे'चा ट्रेलर प्रदर्शित

शुक्रवारी अक्षयने रुग्णालयात जाऊन श्रेयसची भेट घेतली आहे. त्यानंतर श्रेयसची पत्नी दिप्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे. दिप्ती पोस्टमध्ये म्हणाली की, 'माझ्या पतीने नुकत्याच अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. त्या सर्वांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता त्याची प्रकृती स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आम्ही काही गोष्टी खासगी ठेवू इच्छितो, त्याचा तुम्ही आदर करावा अशी मी विनंती करते. तुमचा भक्कम पाठिंबा हा आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्रोत आहे.'

श्रेयस हा वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. या चित्रपटात श्रेयससोबत अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, संजय दत्त, अर्शद वारसी, सुनील शेट्टी,रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लिवर, राजपाल यादव, किकू यादव, कृष्णा अभिषेक, परेश रावल, तुषार कपूर, मीका सिंह आणि दलेर मेहंदी ही तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

पुढील बातम्या