मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade Health: हार्ट अटॅकच्या ५ दिवसांनंतर श्रेयस तळपदेने स्वतः दिली प्रकृतीची माहिती! म्हणाला...

Shreyas Talpade Health: हार्ट अटॅकच्या ५ दिवसांनंतर श्रेयस तळपदेने स्वतः दिली प्रकृतीची माहिती! म्हणाला...

Dec 20, 2023, 07:49 AM IST

  • Shreyas Talpade Health Update:श्रेयस तळपदेला हृदयविकाराच्या झटका आल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत.

Shreyas Talpade Heart Attack Health Update

Shreyas Talpade Health Update:श्रेयस तळपदेला हृदयविकाराच्या झटका आल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत.

  • Shreyas Talpade Health Update:श्रेयस तळपदेला हृदयविकाराच्या झटका आल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत.

Shreyas Talpade Health Update: अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी (१४ ऑक्टोबर) हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर, श्रेयसला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. सोमवारी अभिनेत्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप त्याला डिस्चार्ज मिळालेला नाही. आता खुद्द अभिनेत्यानेच त्याच्या तब्येतीची माहिती चाहत्यांना आणि माध्यमांना दिली आहे. त्याने आपण आता ठीक असल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

श्रेयस तळपदेला हृदयविकाराच्या झटक्याची बातमी आल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत. दरम्यान, आता खुद्द अभिनेत्याने आपली हेल्थ अपडेट सांगितली आहे. अभिनेत्याने एका प्रसिद्ध वेबसाईटशी साधलेल्या संवादात सांगितले की, 'तुम्हा सगळयांच्या पाठिंब्यासाठी आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. मी आता थोडा बरा आहे.' यादरम्यान, श्रेयसने असेही म्हटले की, त्याला अद्याप घरी सोडण्यात आलेले नाही आणि अजूनही तो रुग्णालयात आहे.

Tharala Tar Mag 19th Dec: सायलीच्या बिघडलेल्या अवस्थेला अर्जुनच ठरणार कारणीभूत!

अभिनेता श्रेयस तळपदे त्याचा आगामी चित्रपट 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग संपवून घरी परतला होता. घरी आल्यानंतर श्रेयस तळपदेने पत्नी दीप्ती हिला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. त्यानंतर दीप्तीने श्रेयसला रुग्णालयात नेले, मात्र तो वाटेतच बेशुद्ध पडला. या दरम्यान, श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता आणि तो बेशुद्ध झाला. अभिनेत्याच्या पत्नीने बॉबी देओलला सांगितले होते की, श्रेयसचे हृदय १० मिनिटे बंद पडले होते. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, तेथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने अनेक हिंदी चित्रपटांसोबतच मराठी चित्रपटातही काम केले आहे. श्रेयस तळपदे लवकरच कंगना रनौतसोबत 'इमर्जन्सी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, तो अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' चित्रपटातही झळकणार आहे. त्यांचा हा चित्रपट २०२४मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

पुढील बातम्या