मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, काय झालं होतं ‘त्या’ दिवशी जाणून घ्या

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, काय झालं होतं ‘त्या’ दिवशी जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 20, 2023, 08:43 PM IST

    • Shreyas Talpade Health Update: श्रेयस तळपदेला हृदयविकाराच्या झटका आल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत होते. आता देवाना चाहत्यांची प्रार्थना ऐकली असे म्हणायला हरकत नाही.
Shreyas talpade

Shreyas Talpade Health Update: श्रेयस तळपदेला हृदयविकाराच्या झटका आल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत होते. आता देवाना चाहत्यांची प्रार्थना ऐकली असे म्हणायला हरकत नाही.

    • Shreyas Talpade Health Update: श्रेयस तळपदेला हृदयविकाराच्या झटका आल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत होते. आता देवाना चाहत्यांची प्रार्थना ऐकली असे म्हणायला हरकत नाही.

अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी (१४ ऑक्टोबर) हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर, श्रेयसला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळावा यासाठी चाहते देवाकडे प्रार्थना करत होते. आता देवाना चाहत्यांची प्रार्थना ऐकली आहे. श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदेने नुकतीच एक पोस्ट शेअर करुन श्रेयसच्या हेल्थची माहिती दिली आहे. दीप्तीने सोशल मीडियावर तिचा आणि श्रेयसचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने "अविश्वसनीय सपोर्टसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहे. तुमचे संदेश माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत. मी कदाचित वैयक्तिकरित्या प्रत्येकाला वैयक्तिक रित्या मेसेज करु शकत नसेल, परंतु प्रत्येकाचे मनापासून धन्यवाद" असे लिहिले आहे.
वाचा: मालिकेत दयाबेन दिसणार नाही, निर्मात्यांनी सांगितले कारण

दीप्तीने फोटो शेअर करत, "माझे जीवन, श्रेयस, घरी परतले आहे. तो आता सेफ हे. मी विश्वास कुठे ठेवावा हे मला कळत नाहीये, असं म्हणत मी श्रेयसशी वाद घालत होते. आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे आहे, याचं उत्तर सर्वशक्तिमान देव असं आहे. आमच्या आयुष्यात ही भयानक घटना घडली त्या संध्याकाळी तो माझ्यासोबत होता. यापुढे अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे मला वाटत नाही. मी आमच्या शहरातील चांगल्या लोकांचे आभार मानू इच्छिते. त्या संध्याकाळी मी मदतीसाठी हाक मारली आणि मला त्यापैकी 10 जणांनी मदत केली. श्रेयस गाडीच्या आत पडून होता, त्या लोकांना माहित नव्हते की, ते कोणाला मदत करत आहेत. तरीही ते धावत आले. आमच्यासाठी ते लोक त्या संध्याकाळी देव अवतार होऊन आले. धन्यवाद. मला आशा आहे की, माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी तुमची सदैव ऋणी राहीन. हेच मुंबई शहराचं स्पिरिट आहे" असे म्हटले आहे.

पुढे ती म्हणाली, "मी मित्र, कुटुंब आणि मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे आभार मानते. त्यापैकी काही जण ते करत असलेले सर्व कामे सोडून माझ्यासोबत उभे होते. तुम्हा सर्वांमुळे मी एकटी नव्हते. माझ्याकडे धीर देण्यासाठी खांदे आणि मजबूत राहण्यासाठी आधार देणारी लोकं होती."

पुढील बातम्या