मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talapde: अभिनेता श्रेयस तळपदेला हृदय विकाराचा झटका? कशी आहे प्रकृती

Shreyas Talapde: अभिनेता श्रेयस तळपदेला हृदय विकाराचा झटका? कशी आहे प्रकृती

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 14, 2023, 11:51 PM IST

    • Shreyas Talapde Heart Attack: अभिनेता श्रेयस तळपदे सध्या रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 
Shreyas Talapde Heart Attack

Shreyas Talapde Heart Attack: अभिनेता श्रेयस तळपदे सध्या रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

    • Shreyas Talapde Heart Attack: अभिनेता श्रेयस तळपदे सध्या रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबईत चित्रीकरण सुरु असताना श्रेयस अचानक कोसळला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून एंजिओप्लास्टी सर्जरी करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्सला माहिती दिली की, 'श्रेयसने संपूर्ण दिवस शूटिंग केले. त्याची प्रकृती ठिक होती. सेटवर तो मजामस्ती करत होता. त्याने आज एक अॅक्शन सीन देखील शूट केला. शुटिंग संपवून तो घरी गेला. त्यानंतर त्याने पत्नीला बरे वाटत नसल्याचे सांगितले. त्याच्या पत्नीने तातडीने त्याला रुग्णालयात नेले. दरम्यान, श्रेयस बेशुद्ध झाला.' श्रेयसची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, श्रेयसची प्रकृती सध्या ठिक आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, उच्च रक्तदाबामुळे त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. सध्या श्रेयसवर अंधेरीमधील रुग्णालयात उपचार सुरु असून उद्या डिस्चार्ज मिळणार आहे.

श्रेयस हा वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. या चित्रपटात श्रेयससोबत अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, संजय दत्त, अर्शद वारसी, सुनील शेट्टी,रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लिवर, राजपाल यादव, किकू यादव, कृष्णा अभिषेक, परेश रावल, तुषार कपूर, मीका सिंह आणि दलेर मेहंदी ही तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

पुढील बातम्या