मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Saturday Review: पदार्थातील गोडवा हरवल्याने काठावर पास झालेला 'मिडीयम स्पायसी'

Saturday Review: पदार्थातील गोडवा हरवल्याने काठावर पास झालेला 'मिडीयम स्पायसी'

Payal Shekhar Naik HT Marathi

Jun 18, 2022, 01:24 PM IST

    • चित्रपटात ललित प्रभाकर निस्सीमच्या भूमिकेत आहे तर साई ताम्हणकर त्याची बॉस म्हणजे गौरीच्या भूमिकेत आहे. पर्ण पेठे निस्सीमची जवळची मैत्रीण आहे जी त्याला मनापासून आवडतेय अन दुसरीकडे सईसोबतही त्याची चांगली मैत्री होतेय.
मिडीयम स्पायसी

चित्रपटात ललित प्रभाकर निस्सीमच्या भूमिकेत आहे तर साई ताम्हणकर त्याची बॉस म्हणजे गौरीच्या भूमिकेत आहे. पर्ण पेठे निस्सीमची जवळची मैत्रीण आहे जी त्याला मनापासून आवडतेय अन दुसरीकडे सईसोबतही त्याची चांगली मैत्री होतेय.

    • चित्रपटात ललित प्रभाकर निस्सीमच्या भूमिकेत आहे तर साई ताम्हणकर त्याची बॉस म्हणजे गौरीच्या भूमिकेत आहे. पर्ण पेठे निस्सीमची जवळची मैत्रीण आहे जी त्याला मनापासून आवडतेय अन दुसरीकडे सईसोबतही त्याची चांगली मैत्री होतेय.

प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीच्या आयुष्यात कधीतरी असा प्रसंग घडतो जेव्हा त्याला दोन गोष्टींमधून एकाची निवड करावी लागते. पण एक मिनिट थांबा तुमच्याकडे दोन्ही गोष्टी सारख्याचं रंगाच्या, चवीच्या, तुमच्या आवडणाऱ्या असतील तर? निवड करणं म्हणजे फार अवघड काम होतं. असंच काहीसं झालंय 'मिडीयम स्पायसी' च्या निस्सीमचं. चित्रपटात ललित प्रभाकर निस्सीमच्या भूमिकेत आहे तर साई ताम्हणकर त्याची बॉस म्हणजे गौरीच्या भूमिकेत आहे. पर्ण पेठे निस्सीमची जवळची मैत्रीण आहे जी त्याला मनापासून आवडतेय अन दुसरीकडे सईसोबतही त्याची चांगली मैत्री होतेय. निस्सीम एका फाइव्ह स्टार हॉटेलचा शेफ आहे. मात्र अचानक त्याला पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये सहाय्यक शेफसाठी विचारणा होते आणि इथून खऱ्या कथेला सुरुवात होते.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

आता पॅरिसला जायच्या आधी आपलं जिच्यावर प्रेम आहे तिच्याकडे ते व्यक्त करावं अशी भावना त्याच्या मनात येते पण आपलं नक्की कुणावर प्रेम आहे या विवंचनेत तो पडतो. आणि इथेच खरी गोम आहे. गौरी की प्राजक्ता? प्रेम की मैत्री? नक्की प्रेम म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर निस्सीम संपूर्ण चित्रपटात शोधताना दिसतो. चित्रपटाबद्दल बोलायचं तर पहिल्या भागात कथा आणि स्क्रीनप्ले प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी ठरतो. मात्र दुसऱ्या भागात काय घडेल याचा अंदाज आल्याने चित्रपटीय रटाळ वाटायला लागतो. पहिल्या भागावर असलेली दिग्दर्शकाची पकड दुसऱ्या भागात सैल होताना दिसते. चित्रपटाचं संगीतही प्रेक्षकांच्या मनावर खास छाप पाडत नाहीत.

चित्रपटातील पॉझिटिव्ह बाजू सांगायच्या तर सध्या प्रेक्षकांच्या मेंदूवर सुरू असलेल्या इतर विषयांच्या चित्रपटांच्या माऱ्यातून एक शांत आणि प्रेमळ अनुभव घेण्यासाठी 'मिडीयम स्पायसी' उत्तम आहे. बऱ्याच काळानंतर फक्त प्रेम या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात ललित आणि सई यांसारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने या चित्रपटाचा नूर अगदी पालटून जातो. रटाळ कथेवर कलाकारांची पकड मात्र घट्ट राहते. आणि हीच चित्रपटाची उत्तम बाजू आहे. एकूणच एका चांगल्या विषयावरील चित्रपटात आणखी विषयांचा भडीमार केल्यामुळे कुठेतरी नको असलेला ट्विस्ट देखील तुम्हाला पाहायला मिळतो. मात्र सई आणि ललित यांच्यामुळे 'मिडीयम स्पायसी'चा तडका प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचतोय.

विभाग

पुढील बातम्या