मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sara Tendulkar Deepfake: रश्मिकानंतर सारा तेंडुलकर 'डीपफेक'ची बळी, शुभमन गिलसोबतचा फोटो व्हायरल

Sara Tendulkar Deepfake: रश्मिकानंतर सारा तेंडुलकर 'डीपफेक'ची बळी, शुभमन गिलसोबतचा फोटो व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 09, 2023, 10:59 AM IST

    • Sara Tendulkar and Shubhaman Gill Deepfake: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीफफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सारा डीपफेकची शिकार झाली आहे.
Sara Tendulkar

Sara Tendulkar and Shubhaman Gill Deepfake: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीफफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सारा डीपफेकची शिकार झाली आहे.

    • Sara Tendulkar and Shubhaman Gill Deepfake: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीफफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सारा डीपफेकची शिकार झाली आहे.

Sara Tendulkar and Shubhaman Gill morphed photo: काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आर्टीफिशिअल इंटलिजन्सच्या चुकीच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. अशात सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचा देखील एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सारा शुभमन गिलसोबत दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

सारा तेंडुलकरचे नाव हे क्रिकेटपटू शुभमन गिलशी जोडले जात आहे. अशातच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती शुभमनच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहे. तसेच हा फोटो शेअर करत एका यूजरने 'साराने शुभमनसोबतच्या नात्यावर शिक्का मोर्तब केले आहे' असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच फेक असल्याचे समोर आले.
वाचा: रश्मिकाच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये, दोषीला देणार 'ही' शिक्षा

Sara Tendulkar and Shubhaman Gill morphed photo

साराचा खरा फोटो कोणासोबत?

सारा आणि शुभमनचा हा फोटो फेक आहे. खऱ्या फोटोमध्ये सारासोबत या फोटोमध्ये तिचा भाऊ अर्जुन आहे. २४ सप्टेंबर रोजी साराने अर्जुनच्या वाढदिवशी हा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने अर्जुनला शुभेच्छा दिल्या होत्या. आता हा फोटो बदलून अर्जुनच्या जागी शुभमनचा चेहरा वापरण्यात आला आहे.

रश्मिकाचे डीपफेक व्हिडीओ प्रकरण काय आहे?

रश्मिकाच्या एका चाहत्याने एक्स अकाऊंटवर खरा आणि फेक असे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये झारा पटेल नावाची महिला डिप नेक काळ्या रंगाचा आऊटफिट घालून लिफ्टमध्ये एण्ट्री करताना दिसते. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करुन झाराच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. पत्रकार अभिषेक कुमार यांनी हा प्रकार उघकीस आणला आहे.

विभाग

पुढील बातम्या