मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shamshera: कुछ तो लोग कहेंगे; शमशेरा फ्लॉप झाल्यानंतर संजय दत्तचं रणबीरसाठी पत्र

Shamshera: कुछ तो लोग कहेंगे; शमशेरा फ्लॉप झाल्यानंतर संजय दत्तचं रणबीरसाठी पत्र

Aarti Vilas Borade HT Marathi

Jul 29, 2022, 01:54 PM IST

    • Sanjay Dutt: शमशेरा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप होताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रणबीरवर होत असलेल्या टीकेबद्दल बोलताना संजयने लिहिले आहे.
संजय दत्त (HT)

Sanjay Dutt: शमशेरा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप होताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रणबीरवर होत असलेल्या टीकेबद्दल बोलताना संजयने लिहिले आहे.

    • Sanjay Dutt: शमशेरा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप होताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रणबीरवर होत असलेल्या टीकेबद्दल बोलताना संजयने लिहिले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा जवळपास चार वर्षांनंतर 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा बिग बजेट चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच वाणी कपूर, संजय दत्त (Sanjay Dutt), सौरभ शुक्ला आणि रोनित रॉय यांच्याही भूमिका आहेत. तर दिग्दर्शन करण मल्होत्राने केले आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास १५० कोटी रुपये आहे. पण आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाही. चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आता संजय दत्तने रणबीर कपूरला पत्र लिहिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

काय आहे संजय दत्तची पोस्ट?

"हा एक चित्रपट आहे जो रक्त, घाम आणि अश्रूंनी बनलेला आहे. हे एक स्वप्न आहे जे आम्ही पडद्यावर आणले आहे. चित्रपट प्रेक्षकांना आवडावा म्हणून बनवले जातात. आणि प्रत्येक चित्रपटाला त्याचे प्रेक्षक भेटतात, उशिरा का होईना. शमशेराला बरेच लोक तिरस्कार करतात. तो; काही द्वेष अशा लोकांकडून आला ज्यांनी तो पाहिलाही नाही. मला हे भयंकर वाटते की आपण सर्वांनी केलेल्या मेहनतीचा लोक आदर करत नाहीत" असे म्हटले आहे.

पुढे करण जोहरचा उल्लेख करत तो म्हणाला, 'करण कुटुंबासारखा आहे आणि यश किंवा अपयश बाजूला ठेवून त्याच्यासोबत काम करणे नेहमीच सन्मानाचे असेल. मी सदैव त्याच्या पाठीशी उभा आहे.'

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रणबीरवर होत असलेल्या टीकेबद्दल बोलताना संजयने लिहिले, “आमच्या काळातील सर्वात मेहनती आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एकाच्या कामावर लोक तिरस्कार करण्यास किती उत्सुक आहेत हे पाहून वेदना होतात. कला आणि त्यासाठी आमची बांधिलकी. हे आपल्या वाटेवर येणाऱ्या द्वेषाच्या पलीकडे आहे. चित्रपट आणि त्यातील लोकांबद्दल आपल्याला वाटत असलेले प्रेम जे सांगितले जात आहे त्याच्या पलीकडे आहे.”

पुढील बातम्या