मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanjay Dutt: चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त गंभीर जखमी

Sanjay Dutt: चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त गंभीर जखमी

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 13, 2023, 07:38 AM IST

    • Sanjay Dutt Injured: संजय दत्त त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Sanjay Dutt

Sanjay Dutt Injured: संजय दत्त त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    • Sanjay Dutt Injured: संजय दत्त त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता संजय दत्तने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे तर त्याने दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमध्ये देखील नाव कमावले आहे. सध्या संजय दत्त त्याचा आगामी कन्नड चित्रपट 'केडी: द डेविल'चे चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणादरम्यान संजय दत्त जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

'केडी: द डेविल' या चित्रपटाचे सध्या जोरदार शुटिंग सुरु आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये विस्फोट झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. या ब्लास्टमध्ये संजय दत्त जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: ३० एप्रिलला सलमानला संपवणार; भाईजानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

समोर आलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला गंभीर दुखापत झाली आहे. संजय दत्तच्या हाताचा कोपरा, हात आणि चेहऱ्याला जखम झाली आहे. या घटनेनंतर सध्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. आता संजय दत्त लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

संजय दत्त फाइट मास्टर डॉक्टर रवी वर्मा यांच्या 'केडी: द डेविल' चित्रपटातील एका सीनसाठी फाइट कंपोज करत होता. त्यावेळी झालेल्या स्फोटात संजय दत्त जखमी झाला आहे. सेटवर सर्वजण संजय दत्त लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

विभाग

पुढील बातम्या