मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanjay Dutt: संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले

Sanjay Dutt: संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 13, 2023, 02:16 PM IST

    • Sanjay Dutt: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले होते. पण आता त्याने ट्वीट करत ठिक असल्याचे सांगितले आहे.
Sanjay Dutt (Ashish Vaishnav)

Sanjay Dutt: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले होते. पण आता त्याने ट्वीट करत ठिक असल्याचे सांगितले आहे.

    • Sanjay Dutt: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले होते. पण आता त्याने ट्वीट करत ठिक असल्याचे सांगितले आहे.

दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता संजय दत्तने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे तर त्याने दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमध्ये देखील नाव कमावले आहे. सध्या संजय दत्त त्याचा आगामी कन्नड चित्रपट 'केडी: द डेविल'चे चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणादरम्यान संजय दत्त जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता संजय दत्तने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे हे वृत्त फेटाळले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

संजय दत्तने ट्वीट करत ठिक असल्याची माहिती दिली आहे. "मला गंभीर दुखापत झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण या बातम्या निराधार आहेत. मी ठीक आहे आणि निरोगीदेखील आहे. सध्या मी 'केडी' (KD) या सिनेमाचं शूटिंग करत असून सेटवरील सर्व मंडळी माझी काळजी घेत आहेत. माझ्यासाठी तुम्ही चिंता व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार" या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.
वाचा: दलाई लामांच्या चुंबन प्रकरणानंतर गायिकेचं ट्वीट व्हायरल! म्हणाली..

काय आहे प्रकरण?

'केडी: द डेविल' या चित्रपटाचे सध्या बंगळूरु येथे जोरदार शुटिंग सुरु आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये विस्फोट झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. या ब्लास्टमध्ये संजय दत्त जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. संजय दत्तच्या हाताचा कोपरा, हात आणि चेहऱ्याला जखम झाली आहे. या घटनेनंतर सध्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे अशी माहिती समोर आली होती. मात्र आता असे काही झालेले नाही असे संजय दत्त म्हणाला आहे.

विभाग

पुढील बातम्या