मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanjay Dutt: बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्या मान्यताच्या प्रेमात कसा पडला संजूबाबा?

Sanjay Dutt: बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्या मान्यताच्या प्रेमात कसा पडला संजूबाबा?

Aarti Vilas Borade HT Marathi

Jul 29, 2023, 09:00 AM IST

    • Sanjay Dutt Birthday: आज २९ जुलै रोजी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याची लव्हस्टोरी...
Sanjay Dutt

Sanjay Dutt Birthday: आज २९ जुलै रोजी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याची लव्हस्टोरी...

    • Sanjay Dutt Birthday: आज २९ जुलै रोजी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याची लव्हस्टोरी...

‘ऐ मामू’ म्हणत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर जादू करणारा अभिनेता म्हणजे संजय दत्त. त्याचे लाखो चाहते आहेत. आज २९ जुलै रोजी संजय दत्तचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी. संजय दत्त बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्या मान्यत्याच्या प्रेमात कसा पडला? हे जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

संजय दत्तने १९८१ साली प्रदर्शित झालेल्या 'रॉकी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८७ साली त्याने ऋचा शर्माशी लग्न केले. ऋचा आणि संजय दत्तला त्रिशाला नावाची मुलगी आहे. पण संजय आणि ऋचा यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर ऋचा अमेरिकेत आई-वडिलांसोबत राहत होती. त्यानंतर संजय दत्तचे नाव माधुरी दीक्षितशी जोडले गेले. पण १९९३ साली संजय दत्तच्या आयुष्यात मोठे वादळ आले. त्याला अटक झाली होती.

संजयला भेटण्यासाठी मॉडेस रिया पल्लई तुरुंगात जायची. एका मंदिरात जाऊन संजय दत्तने तिच्याशी लग्न केले होते. पण नंतर संजय दत्त नाडिया दुरानीच्या प्रेमात पडला. त्यामुळे संजय दत्तची दुसरी पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली. संजय परत एकटा पडला होता. त्यानंतर संजय दत्तचा एका मुलीसोबतचा व्हिडीओ समोर आला होता. पण त्यामध्ये त्या मुलीचा चेहरा नीट दिसत नव्हता. स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये संजय दत्त याच मुलीला म्हणजे मान्यताला घेऊन गेला होता. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. नोव्हेंबर २००६मध्ये संजय दत्त आणि मान्यताने लग्न केल्याचे समोर आले होते. मान्यताने काही बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले.

विभाग

पुढील बातम्या