मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanjay Dutt Accident : शूटिंगदरम्यान संजय दत्तचा भीषण अपघात, डोक्याला पडले टाके

Sanjay Dutt Accident : शूटिंगदरम्यान संजय दत्तचा भीषण अपघात, डोक्याला पडले टाके

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 17, 2023, 09:02 AM IST

    • Sanjay Dutt: सध्या संजय दत्त त्याचा आगामी चित्रपट 'डबल आईस्मार्ट'चे चित्रीकरण करत आहे. दरम्यान त्याचा अपघात झाला आहे.
Sanjay Dutt

Sanjay Dutt: सध्या संजय दत्त त्याचा आगामी चित्रपट 'डबल आईस्मार्ट'चे चित्रीकरण करत आहे. दरम्यान त्याचा अपघात झाला आहे.

    • Sanjay Dutt: सध्या संजय दत्त त्याचा आगामी चित्रपट 'डबल आईस्मार्ट'चे चित्रीकरण करत आहे. दरम्यान त्याचा अपघात झाला आहे.

ए मामू म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता संजय दत्त सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. लवकरच त्याचा 'डबल इस्मार्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान संजय दत्तचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

'डबल इस्मार्ट' या चित्रपटाचे बँकॉकमध्ये चित्रीकरण सुरु आहे. तलवारबाजीचा सीन शूट करत असताना संजय दत्तचा अपघात झाला आहे. त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संजय दत्तने उपचार घेतल्यानंतर शुटिंग पूर्ण केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा घटना गेल्या आठवड्यात घडली होती आणि आता संजय दत्त पूर्णपणे बरा आहे.
वाचा: १५ ऑगस्टला चाहत्यांची तुडुंब गर्दी, 'जेलर'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

'डबल इस्मार्ट' हा संजय दत्तचा पहिला तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धुरा पुरी जगन्नाध यांनी केले आहे. त्यांचा या पूर्वीचा 'लायगर' हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला होता. संजय दत्तने 'केजीएफ चॅप्टर 2' या सिनेमाच्या माध्यमातून कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचा 'लियो' हा चित्रपट तामिळ भाषेतील आहे. या चित्रपटातून तो तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

विभाग

पुढील बातम्या