मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Samantha Ruth Prabhu: घटस्फोटानंतरही नागा चैतन्यला वाटतेय समंथाची काळजी; फोन करून म्हणाला...

Samantha Ruth Prabhu: घटस्फोटानंतरही नागा चैतन्यला वाटतेय समंथाची काळजी; फोन करून म्हणाला...

Nov 06, 2022, 04:50 PM IST

  • Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूने एक पोस्ट शेअर करत आपण ‘मायोसिटिस’ नावाच्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली होती.

Naga Chaitanya - Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूने एक पोस्ट शेअर करत आपण ‘मायोसिटिस’ नावाच्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली होती.

  • Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूने एक पोस्ट शेअर करत आपण ‘मायोसिटिस’ नावाच्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली होती.

Samantha Ruth Prabhu: साउथ मनोरंजन विश्वातलं ‘ड्रीम कपल’ म्हणून ओळखली जाणारी जोडी अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांनी एकमेकांपासून वेगळे होत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. घटस्फोटाच्या वृत्तामुळे नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू चांगलेच चर्चेत आले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी आपल्या घटस्फोटाची बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र, यानंतरही दोघे काहीना काही कारणामुळे चर्चेत राहिले. सध्या ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नागा चैतन्यने समंथाला फोन करून तिच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

सध्या समंथा एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. अभिनेत्री तिच्या या आजाराच्या चर्चांमुळे सध्या प्रसिद्धी झोतात आली आहे. यातच आता नागा चैतन्यने तिच्या काळजीपोटी तिला फोन केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपली पूर्वाश्रमीची पत्नी समंथा प्रभू आजारी असल्याचे कळताच अभिनेता नागा चैतन्यने सगळे रुसवेफुगवे बाजूला सारत, तिची फोनवरून चौकशी केली आहे. अभिनेत्याच्या या कृतीमुळे सध्या त्याचे खूप कौतुक होत आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र, आता स्वतः अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने एक पोस्ट शेअर करत आपण ‘मायोसिटिस’ नावाच्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली. अभिनेत्रीच्या या पोस्टनंतर तिचे चाहते चांगलेच काळजीत पडले होते. मात्र, आपल्या चाहत्यांच टेन्शन दूर करत समंथाने सांगितले की, सध्या तिची प्रकृती पूर्णपणे ठीक नसली, तरी रिकव्हरी मोडमध्ये असून, तिच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे.

गंभीर आजाराशी लढत असताना देखील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या आगामी ‘यशोदा’ आणि ‘शाकुंतलम’ या चित्रपटांचे डबिंग पूर्ण करण्यात व्यस्त झाली आहे. तर दुसरीकडे, समंथाचा पूर्वपती अभिनेता नागा चैतन्य देखील दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता.

पुढील बातम्या