मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sam Bahadur: आनंद महिंद्रा आणि सचिन तेंडुलकरने केले ‘सॅम बहादुर’चे तोंडभरून कौतुक

Sam Bahadur: आनंद महिंद्रा आणि सचिन तेंडुलकरने केले ‘सॅम बहादुर’चे तोंडभरून कौतुक

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 04, 2023, 10:31 AM IST

    • Sachin Tendulkar Praises Sam Bahadur Movie: सोशल मीडियावर आनंद महिंद्रा आणि सचिन तेंडुलकरने अभिनेता विकी कौशलचा चित्रपट "सॅम बहादुर"चे कौतुक केले आहे.
Sam Bahadur Review

Sachin Tendulkar Praises Sam Bahadur Movie: सोशल मीडियावर आनंद महिंद्रा आणि सचिन तेंडुलकरने अभिनेता विकी कौशलचा चित्रपट "सॅम बहादुर"चे कौतुक केले आहे.

    • Sachin Tendulkar Praises Sam Bahadur Movie: सोशल मीडियावर आनंद महिंद्रा आणि सचिन तेंडुलकरने अभिनेता विकी कौशलचा चित्रपट "सॅम बहादुर"चे कौतुक केले आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात विकीने सॅम बहादुर यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे कौतुक सर्वजण करताना दिसत आहेत. आता ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि आनंद महिंद्रा यांनी विकीचे कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

सचिन तेंडुलकर 'सॅम बहादुर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला गेला होता. चित्रपट पाहिल्यावर तो म्हणाला की, "हा खूप चांगला चित्रपट आहे. विकीच्या अभिनयाने मी प्रभावित झालो आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ खरोखरच आपल्यासमोर आहेत, असे वाटले.आपल्या देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघावा असे मी म्हणेन. मी म्हणेन की हा चित्रपट सर्व पिढ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे."
वाचा: इंस्टाग्रामने उर्फी जावेदला दिला झटका; अभिनेत्रीचं अकाऊंट झालं निलंबित! कारण काय?

दुसरीकडे आनंद महिंद्रा यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे. "जेव्हा एखादा देश त्यांच्या नायकांच्या कथा सांगणारे चित्रपट तयार करतो, तेव्हा एक शक्तिशाली सद्गुण चक्र तयार होते. विशेषत: सैनिक, नेतृत्व आणि धैर्याच्या कथांबद्दल लोकांना अभिमान वाटतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा लोकांना माहित होते की, त्यांच्या धैर्याचा गौरव केला जाईल तेव्हा आणखी नायक उदयास येतील. हॉलिवूडने शतकानुशतके हे पुण्यचक्र निर्माण केले आहे. त्यामुळे धन्यवाद रॉनी स्क्रूवाला आमच्यासाठी असे चित्रपट बनवल्याबद्दल. विकी कौशल हा सॅम बहादुर यांच्या भूमिकेत पूर्णपणे रूपांतरित झाला. ते पाहा आणि एका अस्सल भारतीय नायकाचा जयजयकार करा" या आशयाची पोस्ट आनंद महिंद्रा यांनी केली आहे.

'सॅम बहादुर' हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, गोविंद नामदेव, मोहम्मद जीशान यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.

पुढील बातम्या