मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raveena Tandon: ताप असतानाही भर पावसात रवीनाने शूट केलं ‘टिप टिप बरसा पानी’! पण अट होती की...

Raveena Tandon: ताप असतानाही भर पावसात रवीनाने शूट केलं ‘टिप टिप बरसा पानी’! पण अट होती की...

Jul 07, 2023, 11:39 AM IST

  • Raveena Tandon Tip Tip Barsa Paani: टिप-टिप बरसा पानी... या गाण्याने लाखो लोकांच्या हृदयात अशी आग लावली की, आजपर्यंत एकही मान्सून ती विझू शकलेला नाही.

Raveena Tandon Tip Tip Barsa Paani

Raveena Tandon Tip Tip Barsa Paani: टिप-टिप बरसा पानी... या गाण्याने लाखो लोकांच्या हृदयात अशी आग लावली की, आजपर्यंत एकही मान्सून ती विझू शकलेला नाही.

  • Raveena Tandon Tip Tip Barsa Paani: टिप-टिप बरसा पानी... या गाण्याने लाखो लोकांच्या हृदयात अशी आग लावली की, आजपर्यंत एकही मान्सून ती विझू शकलेला नाही.

Raveena Tandon Tip Tip Barsa Paani: पावसाळ्यात बॉलिवूडची गाणी ऐकण्याची मजा काही निराळीच असते. खिडकीबाहेर सुंदर रिमझिमणारा पाऊस पडत असतो आणि घरात छान रोमँटिक गाणी वाजत असतात. हा माहोलच वेगळा असतो. अनेकांनी तर पावसाळ्यासाठी खास प्लेलिस्ट देखील बनवून ठेवली आहे. पावसाळ्याची प्लेलिस्ट बनत असताना त्यात आवर्जून एक गाणे असते ते म्हणजे ‘मोहरा’ चित्रपटातील टिप-टिप बरसा पानी... या गाण्याने लाखो लोकांच्या हृदयात अशी आग लावली की, आजपर्यंत एकही मान्सून ती विझू शकलेला नाही. ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या गाण्यासाठी रवीना टंडन हिने प्रचंड मेहनत घेतली होती.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

‘मोहरा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता २९ वर्षे झाली आहेत, अर्थातच या गाण्याला देखील आता २९ वर्षे उलटून गेली आहेत. परंतु, आजही हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून घेतले जाते. या गाण्यात अभिनेत्री रवीना टंडन पिवळ्या रंगाची पारदर्शक साडी नेसून भर पावसात भिजत अप्रतिम डान्स करत आहे. सोबत अक्षय कुमार देखील आपलं नृत्य कौशल्य दाखवत आहे. अक्षय कुमारसोबत रवीनाची केमिस्ट्री पाहून चाहते देखील घायाळ झाले होते. शूटिंगच्या वेळीच हे गाणे नक्की हिट होणार याची खात्री सगळ्यांनाच होते.

Kaavaalaa: रजनीकांतसोबत दिसली तमन्नाची सिझलिंग केमिस्ट्री; ‘जेलर’चं पहिलं गाणं पाहिलंत का?

पण, हे गाणं शूट करणं दोन्ही कलाकारांसाठी, विशेषतः रवीना टंडनसाठी तितकं सोपं नव्हतं. या गाण्याचे शूटिंग करण्यापूर्वी रवीना टंडन खूप घाबरली होती. खरं तर, तिला चित्रपटातलं हे गाणं शूट करायचंच नव्हतं. कारण तिला भीती वाटत होती की, तिच्या वडिलांना असं कामुक गाणं आपल्या मुलीवर चित्रित झालेलं बघायला आवडणार नाही.

एका मुलाखतीत, रवीना टंडनने स्वत: याचा खुलासा केला होता की, तिने त्यावेळी या गाण्याच्या शूटिंगपूर्वी मेकर्ससमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे ती सतत वेगवेगळे टेक घेण्यासाठी साडी बदलणार नाही आणि दुसरी अट म्हणजे या गाण्यात ती चुंबन घेणार नाही. तिच्या या दोन्ही अटी मान्य करण्यात आल्या होत्या. या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी रवीना टंडनला खूप ताप आला होता. मात्र, तरीही तिने कुणालाही हे कळू न देता गाण्याचे शूटिंग पूर्ण केले होते.

विभाग

पुढील बातम्या