मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raju Srivastava: 'चला सुटका झाली', राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट

Raju Srivastava: 'चला सुटका झाली', राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 22, 2022, 12:42 PM IST

    • २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे.
राजू श्रीवास्तव (HT)

२१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे.

    • २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे.

अतिशय लोकप्रिय कॉमेडियन, अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. ११ ऑगस्ट रोजी हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांना दिल्लीमधील सरकारी रुग्णालय एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, एका अभिनेत्याने राजू यांच्या निधनावर विवादास्पद पोस्ट केली. नंतर काही वेळातच अभिनेत्याने माफी देखील मागितली.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

यूट्यूबर अतुल खत्रीने राजू यांच्या आठवणीत पोस्ट लिहिली होती. राजू यांच्या निधनानंतर इंडियन स्टँडअप कॉमेडीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यावर अभिनेता रोहन जोशीने मोठी कमेंट केली आहे. 'आपण ही एकच गोष्टी गमावली नाहीये. हे कर्माचे फळ आहे. एखादा रोस्ट असू दे किंवा एखाद्या बातमीवर कॉमेडी, राजू श्रीवास्तव स्टँडअपच्या नव्या लाटेविषयी बोलण्याची एकही संधी सोडयचा नाही' असे रोहनने म्हटले.
वाचा : राजू श्रीवास्तव यांच्याविषयी विचारताच संतापली तापसी पन्नू, व्हिडीओ व्हायरल

<p>राजू श्रीवास्तव</p>

पुढे त्याने म्हटले की, 'ते नेहमी नवीन आर्टफॉर्मच्या विरोधात चॅनेलवर बोलायचे. त्यांचे हे वागणे चुकीचे होते. त्यांना सर्वजण चांगले म्हणायचे पण कॉमेडी स्क्रीप्टविषयी त्यांना माहिती नव्हते. चला सुटका आता झाली.' रोहन जोशीला या कमेंटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर काही वेळातच त्याने ही कमेंट डिलिट केली.

विभाग

पुढील बातम्या