मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: दीपाने केलाय निर्धार लेकीला शोधूनच आणणार! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्वीस्ट

Rang Maza Vegla: दीपाने केलाय निर्धार लेकीला शोधूनच आणणार! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्वीस्ट

Aug 13, 2023, 03:21 PM IST

  • Rang Maza Vegla Latest Update: येत्या चार दिवसांत मी माझ्या मुलीला शोधून आणेन असा निर्धार दीपाने केला आहे. मालिकेच्या येत्या भागांत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update: येत्या चार दिवसांत मी माझ्या मुलीला शोधून आणेन असा निर्धार दीपाने केला आहे. मालिकेच्या येत्या भागांत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

  • Rang Maza Vegla Latest Update: येत्या चार दिवसांत मी माझ्या मुलीला शोधून आणेन असा निर्धार दीपाने केला आहे. मालिकेच्या येत्या भागांत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

Rang Maza Vegla Latest Update:रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता पुन्हा एकदा नात्यांची गुंतागुंत वाढताना दिसणार आहे. एकीकडे दीपिका आणि दीपा मिळून हरवलेल्या कार्तिकीला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे आता दोन्ही मायलेकींमध्ये देखील खटके उडणार आहेत. कार्तिकीला तिच्या मावशीने म्हणजेच श्वेतानेच किडनॅप केले आहे. श्वेताने परिस्थितीचा फायदा घेत दीपा आणि कार्तिक यांना पुन्हा एकदा एकमेकांपासून दूर करण्यासाठी हा नवा डाव रचला होता. या डावात आता संपूर्ण इनामदार कुटुंब फसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ताल करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

आयेशाच्या कुटुंबामुळे आधीच इनामदार कुटुंबात वादाची ठिणगी पडली होती. जीवाला जीव देणाऱ्या दोन्ही बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात पडल्याने एक नवं वादळ त्यांच्या आयुष्यात आलं होतं. आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन यानेच दोघींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवलं होतं. मात्र, हे समोर आल्यानंतरही कार्तिकीने त्याला मिळवण्याचा हट्ट धरला होता. आर्यन उर्फ नकुलला मिळवण्यासाठी कार्तिकीने दीपिकासह सगळ्यांनाच त्रास द्यायला सुरुवात केली होती. या दरम्यान तिने श्वेताची मदत घ्यायचा ही प्रयत्न केला.

Maharashtrachi Hasyajatra: पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवणार; ‘हा’ अभिनेता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतणार!

मात्र, श्वेताने आपण मदत करतोय असं भासवून वेगळाच डाव रचला. आर्यन आणि कार्तिकीचं भांडण झाल्यावर श्वेताने कार्तिकीला किडनॅप केले. तर, याचा सगळा दोष तिने आर्यनवर टाकला होता. मात्र, आर्यनची आजी देशमुख बाई यांनी या मागच्या खऱ्या सूत्रधाराला अर्थात श्वेताला शोधून काढले. आता दोघींनी मिळून नवा डाव रचला असून, या प्रकरणातील सगळे पुरावे आणून त्यांनी इनामदारांच्या घरातच लावले. पोलीस तपास करत असताना त्यांच्या हाती हे पुरावे लागले. त्यामुळे आता संशय इनामदार कुटुंबावर घेतला जात आहे.

दुसरीकडे दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुलींच्या वर्णाची तुलना करून दीपावर गंभीर आरोप केले जात आहे. मात्र, आपण आपल्या दोन्ही मुलींवर समान प्रेम करतो आणि त्यांना कधीच अंतर दिलं नाही म्हणत पण घेणार आहे. येत्या चार दिवसांत मी माझ्या मुलीला शोधून आणेन असा निर्धार दीपाने केला आहे. मालिकेच्या येत्या भागांत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

पुढील बातम्या