मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: दीपाला घटस्फोट देऊन कार्तिक आयेशाशी लग्न करणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये ट्वीस्ट

Rang Maza Vegla: दीपाला घटस्फोट देऊन कार्तिक आयेशाशी लग्न करणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये ट्वीस्ट

Aug 22, 2023, 03:11 PM IST

  • Rang Maza Vegla Latest Update: श्वेता, आयेशा आणि तिच्या आईला धडा शिकवण्यासाठी इनामदार कुटुंबातील महिला वर्ग एकत्र आला आहे.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update: श्वेता, आयेशा आणि तिच्या आईला धडा शिकवण्यासाठी इनामदार कुटुंबातील महिला वर्ग एकत्र आला आहे.

  • Rang Maza Vegla Latest Update: श्वेता, आयेशा आणि तिच्या आईला धडा शिकवण्यासाठी इनामदार कुटुंबातील महिला वर्ग एकत्र आला आहे.

Rang Maza Vegla Latest Update:छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मध्ये आता नवा ड्रामा बघायला मिळणार आहे. श्वेता, आयेशा आणि तिच्या आईला धडा शिकवण्यासाठी इनामदार कुटुंबातील महिला वर्ग एकत्र आला आहे. दीपिका, दीपा, कार्तिकी आणि सौंदर्या या चौघीजणी मिळून आयेशाचा पर्दाफार्श करणार आहेत. यासाठी त्यांनी एक नवा डाव रचला आहे. यानुसार ते पुन्हा एकदा दीपा आणि कार्तिक यांचा घटस्फोट होत असल्याचं चित्र श्वेता आणि आयेशासमोर उभं करणार आहेत. यासाठी ते आता आर्यनची मदत घेणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुलींचे एकाच मुलावर प्रेम आहे. आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या व्यक्ती बनून दीपिका आणि कार्तिकी यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. मात्र, आता त्याचा खरा चेहराही सगळ्यांसमोर आला आहे. यानंतर आता तो सत्याची साथ देऊन आपल्या चुकांचं प्रायश्चित्त घेणार आहे. मात्र, यावेळी दीपा आयेशाला तिच्या चुकांची मोठी शिक्षा देणार आहे. आपल्या कुटुंबाला सतत त्रास देणाऱ्या आयेशाचा आता ती चांगलीच अद्दल घडवणार आहे.

कार्तिकशी आपलं लग्न व्हावं, म्हणून आयेशाने अनेक प्रयत्न केले. कधी तिने दीपाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर कधी कार्तिक आणि दीपामध्ये मोठा गैरसमज निर्माण केला. मात्र, दीपा नेहमीच सगळ्या संकटांना अतिशय धैर्याने सामोरी गेली होती. दीपाने नेहमीच आपला संसार वाचवा म्हणून अनेक प्रयत्न केले. मात्र, यावेळेस आयेशाने तिच्या मुलींच्या आयुष्याचा खेळ करून, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता दीपामधली आई चांगलीच पेटून उठली आहे. ती आता आयेशाला तिच्या सगळ्या कृत्यांची शिक्षा घडवणार आहे. यासाठी ते आता घटस्फोटाचं नाटक रचणार आहेत.

मात्र, आता प्रेक्षकांना देखील थोडं गोंधळात टाकणारं कथानक सुरू झालं आहे. एकीकडे हे सगळं नाटक सुरू असताना, आता दीपा आणि कार्तिक खरंच घटस्फोट घेणार का? आणि कार्तिकी आणि दीपिका यांच्या प्रेमामुळे आई वडिलांमध्ये दुरावा येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

विभाग

पुढील बातम्या