मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: आयेशा कार्तिकला भेटू शकेल का? ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये रंजक वळण

Rang Maza Vegla: आयेशा कार्तिकला भेटू शकेल का? ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये रंजक वळण

Jul 12, 2023, 02:20 PM IST

  • Rang Maza Vegla Latest Episode: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. एकीकडे आयेशाचा खोटेपणा समोर आला आहे. तर आता कार्तिक आणि दीपामधील दुरावा देखील संपला आहे.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Episode:‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. एकीकडे आयेशाचा खोटेपणा समोर आला आहे. तर आता कार्तिक आणि दीपामधील दुरावा देखील संपला आहे.

  • Rang Maza Vegla Latest Episode: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. एकीकडे आयेशाचा खोटेपणा समोर आला आहे. तर आता कार्तिक आणि दीपामधील दुरावा देखील संपला आहे.

Rang Maza Vegla Latest Episode:रंग माझा वेगळा’ या मालिकेत सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. एकीकडे आयेशाचा खोटेपणा समोर आला आहे. तर आता कार्तिक आणि दीपामधील दुरावा देखील संपला आहे. मात्र, आता एक नवं संकट त्यांच्यासमोर उभं राहणार आहे. आयेशा खरंच वेडी झाली आहे की, ती केवळ नाटक करत आहे, हे जाणून घेण्यासाठी दीपा आता नवी योजना आखणार आहे. एकीकडे दीपा आयेशाला शिक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे मात्र, आपण पकडले जाऊ या भितीने श्वेता आदित्यसोबत घर सोडून जायचा प्रयत्न करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

आयेशा पकडली गेली तर, आपला देखील यात हात होता ही गोष्ट सगळ्यांसमोर येईल आणि आपल्याला शिक्षा होईल, याची भीती श्वेताला वाटत आहे. यामुळे श्वेता दोन्ही भावांच्या नात्यात वितुष्ट आणून आदित्यला इनामदार कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण ही घर सोडून निघून जाऊन म्हणून ती आदित्यची मनधरणी करत आहे. मात्र, कार्तिकच्या आपल्यावरील प्रेमामुळे आदित्य घर सोडून जाण्याचा निर्णय कधीच घेणार नाही, याची कल्पना श्वेताला देखील आहे. त्यामुळेच ती सतत आदित्यला धमकावत आहे.

Apurva Gore: जरीच्या साडीत कशी सजून धजून... ‘आई कुठे काय करते’च्या ईशाचा मधाळ अंदाज बघाच!

दुसरीकडे दीपा आयेशाबद्दलची सगळी माहिती गोळा करून तिच्या डॉक्टरपर्यंत पोहोचली आहे. दीपाने डॉक्टरकडून आयेशाच्या तब्येतीची माहिती काढून घ्यायचा प्रयत्न केला. यावेळी आयेशाला खरंच मानसिक धक्का बसला असून, ती विचित्र वागत असल्याचं डॉक्टर दीपाला सांगतात. जर, आयेशासमोर खरा कार्तिक आला तरच ती यातून बाहेर पडेल आणि तिची स्मरणशक्ती परत येईल, असे डॉक्टर तिला सांगतात. तर, आयेशा घरातून निघून गेल्यामुळे घाबरलेली तिची आई आर्यनला फोन करणार आहे.

आयेशा आपल्या घरातून निघून कार्तिकला भेटण्यासाठी इनामदारांच्या घरी पोहोचणार आहे. जर, कार्तिक प्रत्यक्ष आयेशाला भेटला तर तिच्या जुन्या आठवणी परत येण्याची शक्यता आहे. यानंतर कार्तिक आणि दीपा तिच्या शिक्षेसाठी पुढचा प्लान करू शकणार आहेत. आता आयेशा इनामदारांच्या घरापर्यंत पोहोचू शकेल का? आणि तिची कार्तिकशी भेट होईल का? हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.

पुढील बातम्या