मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: अखेर देशमुख बाईंचा डाव उघडकीस येणार! सौंदर्या-दीपा मिळून धडा शिकवणार

Rang Maza Vegla: अखेर देशमुख बाईंचा डाव उघडकीस येणार! सौंदर्या-दीपा मिळून धडा शिकवणार

Aug 08, 2023, 02:42 PM IST

  • Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आणि कार्तिक यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या नात्यात पुन्हा दुरावा निर्माण करण्यासाठी श्वेता आणि आयेशाची आई नवे डाव रचत आहेत.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आणि कार्तिक यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या नात्यात पुन्हा दुरावा निर्माण करण्यासाठी श्वेता आणि आयेशाची आई नवे डाव रचत आहेत.

  • Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आणि कार्तिक यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या नात्यात पुन्हा दुरावा निर्माण करण्यासाठी श्वेता आणि आयेशाची आई नवे डाव रचत आहेत.

Rang Maza Vegla Latest Episode: रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता सगळ्या कारस्थानांचा उलगडा होताना दिसणार आहे. एकीकडे ही मालिका शेवटाच्या दिशेने वळताना दिसत आहे. तर, दुसरीकडे सगळ्यांची खरी रूपं समोर येणार आहेत. सध्या मालिकेच्या कथानकात दीपा आणि कार्तिक यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या नात्यात पुन्हा दुरावा निर्माण करण्यासाठी श्वेता आणि आयेशाची आई नवे डाव रचत आहेत. मात्र, आता त्यांचं बिंग फुटणार आहे. दीपा आणि सौंदर्यापुढे त्यांचा खरा चेहरा येणार असून, आता दोघी मिळून त्यांना धडा शिकवणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

दीपा आणि कार्तिक यांचा बदला घेण्यासाठी आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याने एकाचवेळी आर्यन आणि नकुल बनून दीपिका आणि कार्तिकी यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. मात्र, आता त्याच्यासमोर देखील आपल्या आजीचे आणि मावशीचे खरे रूप आले आहे. त्यामुळे त्याने देखील सत्याची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. यात तो दीपिकावर मनापासून खरंप्रेम करू लागला होता. मात्र, त्याच हे खोटं रूप कार्तिकी आणि दीपिका दोघींसमोर आलं. आपल्या बहिणीच्या सुखासाठी जरी दीपिकाने आर्यनला नकार दिला असला तरी कार्तिकी मात्र खूप बिथरली आहे. तिने श्वेताशी हात मिळवणी करून आता सगळ्यांना त्रास देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, श्वेताशी हातमिळवणी करून ती आता स्वतःच फसली आहे.

Jailer: रजनीकांतची क्रेझच न्यारी! ‘जेलर’ पाहण्यासाठी बंगळूरूमध्ये कर्मचाऱ्यांना सुट्टी अन् मोफत तिकीटही!

श्वेताने कार्तिकीला किडनॅप करून सगळा संशय आर्यनवर ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिचा हा डाव आर्यनच्या आजीच्या म्हणजेच देशमुख बाईंच्या लक्षात आला आणि त्यांनी श्वेताला रंगेहाथ पकडलं. मात्र, आता त्या या डावात कार्तिकला फसवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यात त्या श्वेताला देखील सामील करून घेणार आहेत. तर, दुसरीकडे श्वेता त्यांची साथ देऊन सगळे पुरावे कार्तिकच्या रूममध्ये लपवून ठेवणार ठेवणार आहे. तिचा हा डाव आता दीपाच्या लक्षात येणार आहे.

तर, आता दीपा आणि सौंदर्या दोघी मिळून देशमुख बाई आणि श्वेताचा डाव उधळून लावणार आहेत. यावेळी सासू-सून मिळून आपल्या घरावर आलेल्या संकटाचा सामना करणार आहेत. आता दीपा आपल्या मुलीला शोधू शकेल का? आणि आपला संसार वाचवू शकेल का? हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.

विभाग

पुढील बातम्या