मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिक मिळून करणार आयेशाचा भांडाफोड; ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट!

Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिक मिळून करणार आयेशाचा भांडाफोड; ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट!

Jul 02, 2023, 04:19 PM IST

  • Rang Maza Vegla Latest Episode: एकीकडे कार्तिकला सगळं सत्य कळलं आहे. तर, दुसरीकडे दीपाच्या हातात देखील सगळे पुरावे लागले आहेत.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Episode: एकीकडे कार्तिकला सगळं सत्य कळलं आहे. तर, दुसरीकडे दीपाच्या हातात देखील सगळे पुरावे लागले आहेत.

  • Rang Maza Vegla Latest Episode: एकीकडे कार्तिकला सगळं सत्य कळलं आहे. तर, दुसरीकडे दीपाच्या हातात देखील सगळे पुरावे लागले आहेत.

Rang Maza Vegla Latest Episode: रंग माझा वेगळा’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. एकीकडे कार्तिक आणि दीपा दोघांसमोर सत्याचा उलगडा झाला आहे. तर, दुसरीकडे स्वतःच्याच डावात आयेशा आणि श्वेता दोघीही अडकल्या आहेत. आता दोघींचं पितळ लवकरच उघडं पडणार आहे. दीपा आणि कार्तिक दोघी मिळून आता सगळ्यांसमोर सत्य उघड करणार आहेत. यामुळे आता सगळ्यांच्या समोर खरा गुन्हा आणि गुन्हेगार येणार आहेत. यामुळे आता दीपा आणि कार्तिक पुन्हा एक होणार आहेत. त्यांच्या संसारावरील संकट दूर होऊन ते पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

एकीकडे कार्तिकला सगळं सत्य कळलं आहे. तर, दुसरीकडे दीपाच्या हातात देखील सगळे पुरावे लागले आहेत. त्यामुळे आता कार्तिकला त्याच्या चुकांबद्दल कळले आहे. आपण दीपाशी वाईट वागलो. तिची चुकी नसताना देखील आपण तिचा बदला घेत होतो, हे आता कार्तिकला कळले आहे. त्यामुळे आता तो प्रायश्चित्त घेण्याचा निर्णय घेणार आहे. दरम्यान त्याने दीपाची माफी देखील मागितली आहे. मात्र, आता कार्तिक आणि दीपाचा संसार पुन्हा नव्याने सुरू होऊ शकेल का, हे लवकरच कळणार आहे.

Satyaprem Ki Katha : बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दिसली कार्तिक-कियाराची जादू; ‘सत्यप्रेम की कथा’ची जोरदार कमाई!

साक्षीच्या पतीने कार्तिकला सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या सांगितल्या आहेत. कार्तिकने त्याला धमकी देऊन त्याच्याकडून सत्यता वदवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्याने आपण पैसे घेऊन त्याबदल्यात खोटं बोलल्याची कबुली दिली आहे. साक्षीच्या पतीने दिसलेल्या कबुलीमुळेच आता कार्तिकसमोर सगळी सत्य परिस्थिती येणार आहे. त्याच्या आपल्या चुकीच्या वागणुकीबद्दल वाईट देखील वाटणार आहे. यावेळी तो मंदिरात जाऊन विठोबासमोर आपली चूक कबुल करणार आहे.

साक्षीचा खून कार्तिकने नाही तर, आयेशाने केला आहे, हे सत्य घाडगे वकिलाने दीपाला सांगितले होते. तर, आयेशाच्या या काळ्या कारनाम्याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे देखील त्याने सांगितले होते. मात्र, हा पेनड्राईव्ह नेमका कुठे आहे, हे सांगण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अखेर तो शोधण्यात दीपाला यश मिळालं आहे. आता श्वेता पुढे काय करणार, हे लवकरच कळणार आहे.

पुढील बातम्या