मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: आर्यन करणार दीपा आणि कार्तिकची मदत! ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार नवा ट्वीस्ट

Rang Maza Vegla: आर्यन करणार दीपा आणि कार्तिकची मदत! ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार नवा ट्वीस्ट

Jul 10, 2023, 03:31 PM IST

  • Rang Maza Vegla latest Episode: आयेशाने आपला डाव साध्य करायला आर्यनची मदत देखील घेतली होती. मात्र, आता आर्यन खोट्याची बाजू न घेता सत्याच्या बाजूने लढताना दिसणार आहे.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla latest Episode: आयेशाने आपला डाव साध्य करायला आर्यनची मदत देखील घेतली होती. मात्र, आता आर्यन खोट्याची बाजू न घेता सत्याच्या बाजूने लढताना दिसणार आहे.

  • Rang Maza Vegla latest Episode: आयेशाने आपला डाव साध्य करायला आर्यनची मदत देखील घेतली होती. मात्र, आता आर्यन खोट्याची बाजू न घेता सत्याच्या बाजूने लढताना दिसणार आहे.

Rang Maza Vegla latest Episode:रंग माझा वेगळा’ ही मालिका आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. या मालिकेत आता लवकरच आयेशाचा पर्दाफार्श होणार आहे. तिचे सगळे काळे कारनामे बाहेर येणार असून, तिला मोठी शिक्षा होणार आहे. यात तिच्या बहीणीचा मुलगा दीपा आणि कार्तिकची साथ देणार आहे. आयेशाने आपला डाव साध्य करायला आर्यनची मदत देखील घेतली होती. मात्र, त्यावेळी तिने आर्यनला सगळ्या खोट्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे आता आर्यन खोट्याची बाजू न घेता सत्याच्या बाजूने लढताना दिसणार आहे. त्यामुळे आता लवकरच आयेशा कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

कार्तिक आणि दीपाचा संसार होऊ नये यासाठी आयेशाने सगळे प्रयत्न केले. मात्र, सगळ्या संकटांवर मात्र करूनही दीपा आणि कार्तिक एकत्र येतायत हे बघून तिने मोठा कट रचला होता. तिच्या या कटामुळे दीपाची मैत्रीण साक्षी हिचा जीव गेला. साक्षीच्या ऑपरेशननंतर आयेशाने तिला देण्यात आलेलं इंजेक्शन बदलून दीपावर सूड उगवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या सगळ्यात साक्षीचा मृत्यू झाला. साक्षीचा खून झाला आणि तो कार्तिकने केला हे खोट सांगण्यासाठी आयेशाने साक्षीच्या पतीला पैसे देऊ केले. यातून एक खोटी केस उभी राहिली.

Janhvi Kapoor: शिफॉन साडीत जान्हवी कपूरचा मादक अंदाज! फोटोंवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा

साक्षीच्या मृत्यू प्रकरणात कार्तिकला दोषी मानण्यात आले आणि त्याला तब्बल १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. दुसरीकडे त्याच्या मनात दीपाबद्दल विष पेरण्यात आलं. यामुळे दीपा आणि त्याच्या नात्यात दुरावा आला होता. मात्र, आता कार्तिकला सगळी सत्य परिस्थिती कळली. त्यांनी सगळे पुरावे जमा करून ते सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. मात्र, आता ते नवी योजना आखणार असून, या योजनेनुसार ते आयेशाला तिच्याच जाळ्यात अडकवणार आहेत. यात आर्यन त्यांची मदत करणार आहे.

साक्षीच्या मृत्यू प्रकरणाचे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह आयेशाने नष्ट केला. तर, दुसरीकडे ती वेड लागल्याचं ढोंग करून १४ वर्ष पोलिसांपासून पळ काढत आहे. मात्र, आता तिचं हेच बिंग फुटणार आहे. दीपा, कार्तिक, दीपिका आणि आर्यन मिळून आयेशाचा डाव उधळून लावणार आहेत.

पुढील बातम्या