मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिकचा वाद होणार! इनामदारांच्या डावात श्वेता आणि आयेशा अडकणार?

Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिकचा वाद होणार! इनामदारांच्या डावात श्वेता आणि आयेशा अडकणार?

Aug 23, 2023, 02:30 PM IST

  • Rang Maza Vegla Latest Episode 23 August 2023: इनामदारांच्या घरातील महिलावर्गाने आता आयेशा आणि श्वेता विरोधात शड्डू ठोकला आहे. सगळ्या आता एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांचा बदला घेणार आहेत.

Rang Maza Vegla Latest Episode 23 August 2023

Rang Maza Vegla Latest Episode 23 August 2023: इनामदारांच्या घरातील महिलावर्गाने आता आयेशा आणि श्वेता विरोधात शड्डू ठोकला आहे. सगळ्या आता एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांचा बदला घेणार आहेत.

  • Rang Maza Vegla Latest Episode 23 August 2023: इनामदारांच्या घरातील महिलावर्गाने आता आयेशा आणि श्वेता विरोधात शड्डू ठोकला आहे. सगळ्या आता एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांचा बदला घेणार आहेत.

Rang Maza Vegla Latest Episode 23 August 2023: रंग माझा वेगळा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे. शेवट गोड करण्यासाठी आता या मालिकेत अनेक घडामोडी वेगाने घडताना दिसणार आहेत. आता दीपा आणि कार्तिक आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मिळून आयेशा आणि श्वेता यांना आपल्या डावात अडकवून त्यांच्याकडून सत्य वदवून घेणार आहेत. आता या मालिकेत रंजक वळण येणार आहे. अखेर सत्याचा विजय होणार असून, वाईटाचा नाश होणार आहे. यासाठी आता संपूर्ण इनामदार कुटुंब एकत्र आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

आता इनामदारांच्या घरातील महिलावर्गाने आता आयेशा आणि श्वेता विरोधात शड्डू ठोकला आहे. सगळ्या आता एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांचा बदला घेणार आहेत. त्यांना चांगलीच अद्दल घडवणार आहेत. आता दीपा, सौंदर्या, कार्तिकी आणि दीपिका यांनी ठरवलेल्या प्लॅननुसार कार्तिकी श्वेताचा विश्वास जिंकून तिच्याकडून सत्य परिस्थिती वदवून घेणार आहे. तर, दीपा, कार्तिक आणि सौंदर्या हे लोक आयेशाकडून सत्य परिस्थिती जाणून घेणार आहेत. दोघींचे कटकारस्थान आता ते उघडकीस आणणार आहेत. यात संपूर्ण देशमुख कुटुंबाला यश मिळताना दिसणार आहे.

Subhedar: प्रदर्शनाआधीच ‘सुभेदार’नं रचला नवा विक्रम; ठरला ‘हा’ मान मिळवणारा मराठीतील पहिला चित्रपट!

कार्तिकी आपण आपल्या कुटुंबाच्या विरोधात असल्याचे भासवून श्वेताचा विश्वास जिंकून घेणार आहे. या वेळी श्वेता देखील कार्तिकीच्या डावात अडकणार असून, कार्तिकीला सगळी सत्य परिस्थिती सांगणार आहे. तर, कार्तिकी देखील तिचं हे सत्य रेकॉर्ड करून घेणार आहे. यानंतर ती आई दीपाला फोन करून काम झाल्याचं सांगणार आहे. यावेळी श्वेता सगळा दोष आयेशा आणि तिच्या आईवर टाकणार आहे. दुसरीकडे, दीपा आयेशा आणि कार्तिक यांना एकत्र भेटून त्यांच्या वाद घालणार आहे. यावेळी सौंदर्या देखील आयेशा आणि कार्तिकची बाजू घेऊन दीपालाच बोल लगावणार आहेत. अर्थात हा त्यांचाच डाव आहे.

यावेळी कार्तिक आपण दीपाला घटस्फोट देऊन, आयेशाशी लग्न करणार असल्याचे बोलणार आहे. यावेळी दीपा पुन्हा एकदा आयेशा आणि कार्तिक यांच्यावर बरसणार आहे. मात्र, यावेळी सौंदर्या त्यांच्या वादात पडून कार्तिक आणि आयेशाची बाजू घेणार आहे. यावेळी आयेशा देखील त्यांच्या या डावात अडकणार आहे. तर, त्यांचं हे नाटक दीपिका मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणार आहे. आता आपला हा डाव यशस्वी झाल्यावर ते पुढचं पाऊल उचलणार आहेत. सौंदर्या इनामदार आता कार्तिक आणि आयेशाचं खोटं लग्न लावून देणार आहेत. आता मालिकेत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

पुढील बातम्या