मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ranbir Kapoor Trouble: ख्रिसमस पार्टीतील कृत्य रणबीर कपूरला भोवणार? अभिनेत्याच्या अडचणीत वाढ!

Ranbir Kapoor Trouble: ख्रिसमस पार्टीतील कृत्य रणबीर कपूरला भोवणार? अभिनेत्याच्या अडचणीत वाढ!

Dec 27, 2023, 10:17 PM IST

  • Ranbir Kapoor In Trouble: कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर कपूर याने केकवर दारू ओतताना 'जय माता दी' म्हटले होते.

Ranbir Kapoor In Trouble

Ranbir Kapoor In Trouble: कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर कपूर याने केकवर दारू ओतताना 'जय माता दी' म्हटले होते.

  • Ranbir Kapoor In Trouble: कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर कपूर याने केकवर दारू ओतताना 'जय माता दी' म्हटले होते.

Ranbir Kapoor In Trouble: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आता नव्या वादात अडकला आहे. ख्रिसमसची पार्टी आता रणबीरला महागात पडणार आहे. कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर कपूर याने केकवर दारू ओतताना 'जय माता दी' म्हटले होते. रणबीरचे हेच कृत्य त्याला आता अडचणीत आणणारे ठरले आहे. याच व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अभिनेता रणबीर कपूर याच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू धर्माचा अपमान केल्याचे म्हणत अभिनेता रणबीर कपूर विरोधात कलम २९५ (ए), २९८, ५०० आणि ३४ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

'झूम'च्या रिपोर्टनुसार, सनातन धर्माचे उपदेशक संजय दीनानाथ तिवारी यांनी अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी अभिनेत्याने हिंदू धर्माचा अपमान केल्याचे म्हटले आहे. घाटकोपर पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सनातन धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रणबीर कपूर आणि इतर कपूर कुटुंबाविरुद्ध घाटकोपर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (ए), २९८, ५०० आणि ३४अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत ही तक्रार केली आहे. अन्य कोणताही विशेष सण साजरा करताना केकवर मादक पदार्थ शिंपडून जाळपोळ करून हिंदू देवी-देवतांचे आवाहन केले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अभिनेता रणबीर कपूरने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्य तसेच, लहान मुलेही उपस्थित होती. या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केकवर दारू ओतली जाते आणि त्यानंतर रणबीर कपूर 'जय माता दी' म्हणत केक फ्लेम करतो. रणबीर कपूर 'जय माता दी' म्हणताच घरातील बाकीचे सदस्यही जय माता दी म्हणतात. हिंदू धर्मात प्रतिबंधित औषधे जाणूनबुजून वापरल्यानंतर या सर्वांनी अग्नी प्रज्वलित करण्याबरोबरच हिंदू देव-देवतांनाही आवाहन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विभाग

पुढील बातम्या