मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brahmastra: ‘ब्रह्मास्र’साठी किती मानधन घेतले?, रणबीर कपूर म्हणाला...

Brahmastra: ‘ब्रह्मास्र’साठी किती मानधन घेतले?, रणबीर कपूर म्हणाला...

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 24, 2022, 10:57 AM IST

    • Ranbir Kapoor: ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे बजेट जवळपास ४५० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. पण रणबीरने चित्रपटासाठी एक रुपयाही माधन घेतले नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या
ब्रह्मास्त्र (HT)

Ranbir Kapoor: ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे बजेट जवळपास ४५० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. पण रणबीरने चित्रपटासाठी एक रुपयाही माधन घेतले नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या

    • Ranbir Kapoor: ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे बजेट जवळपास ४५० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. पण रणबीरने चित्रपटासाठी एक रुपयाही माधन घेतले नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. चित्रपटची कथा आणि तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटासाठी रणबीरने किती मानधन घेतले असेल? अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. आता स्वत: रणबीरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे बजेट जवळपास ४५० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. पण रणबीरने चित्रपटासाठी एक रुपयाही माधन घेतले नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अयान मुखर्जीने यावर वक्तव्य केले आहे. "'ब्रह्मास्र’ चित्रपटामागे अनेकांची मेहनत आणि त्याग आहेत. या चित्रपटासाठी एका आघाडीच्या अभिनेत्याने जितके मानधन घेतले असते, त्या तुलनेत रणबीरने कमी मानधन घेतले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण याशिवाय चित्रपट बनूच शकला नसता" असे अयान म्हणाला. पुढे त्याने रणबीरला कदाचित या प्रश्नाचे उत्तर द्यायला आवडणार नाही असे देखील म्हटले आहे.
वाचा: चित्रपट हा चित्रपटगृहात बघण्याची मजाच वेगळी! हाऊसफूल्लच पाटी पाहून हमेंत ढोमेचे ट्वीट

त्यानंतर रणबीरने देखील यावर प्रतिक्रिया दिली. 'मी मानधन घेतले की नाही याविषयी बोलणे हा तुमचा प्रश्न आहे. पण मी मानधन घेतले आहे. मी नेहमी पुढचा विचार करत असतो. ‘ब्रह्मास्र’च्या पहिल्या भागासाठी मी मानधन घेतलेले नाही. परंतु, ब्रह्मास्रचे तीनही भाग खूप कमाई करतील, असा मला विश्वास आहे. माझ्या मानधनापेक्षाही ती कमाई खूप जास्त असणार' असे रणबीर म्हणाला.

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग

पुढील बातम्या