मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Animal Review: बॉबी देओलला कमी सीन, रणबीर कपूरचा स्वॅग; जाणून घ्या ‘अॅनिमल’ रिव्ह्यू

Animal Review: बॉबी देओलला कमी सीन, रणबीर कपूरचा स्वॅग; जाणून घ्या ‘अॅनिमल’ रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 01, 2023, 01:48 PM IST

    • Ranbir Kapoor Animal Review: रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट कसा आहे जाणून घेऊया..
Animal Trailer

Ranbir Kapoor Animal Review: रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट कसा आहे जाणून घेऊया..

    • Ranbir Kapoor Animal Review: रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट कसा आहे जाणून घेऊया..

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असतो. त्याने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याच्या प्रत्येक भूमिकेचे चाहत्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले. आज त्याचा 'अॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा कशी? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणूनन घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

संदीप रेड्डी वांगा यांच्या 'अॅनिमल' या चित्रपटाची सुरुवात कुटुंबातील लोकांच्या भावनिक गोष्टींनी होते. रणबीर कपूर साकारत असलेली भूमिका हळूहळू एक वेगळी सायकोलॉजी तयार करते. आपल्या वडिलांच्या प्रेमात असलेला मुलगा त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. 'काही ही' हे दाखवून देण्यात तू कुठपर्यंत जाऊन पोहोचला आहे हे तुम्हाला चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत कळते. प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यासाठी संदीप यांनी वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाचे नाव माध्यांतरापर्यंत सांगितलेले नाही. त्यानंतर पुढच्या भागात बॉबी देओलची एण्ट्री होते. रणबीर आणि बॉबीचे काय कनेक्शन आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
वाचा: 'या' कारणामुळे राणी मुखर्जी अन् काजोलमधील दुरावा झाला कमी

रणबीर कपूरच्या अभिनयाविशषी बोलायचे झाले तर तो पडद्यावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. त्याचा अभिनय हा पाहण्यासारखा आहे. जवळपास रणबीरने संपूर्ण चित्रपट खल्ला आहे. पहिल्या भागातच रणबीरची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. दुसऱ्या भागात सगळे ट्विस्ट येतात. बॉबी देओलची एण्ट्री होते. पण बॉबीला एकही डायलॉग नाही. त्याची एण्ट्री थोडच वेळापूर्ती असते पण भाव खाऊन जाते. बॉबी आणि रणबीरच्या वडिलांची दुश्मनी असते. या सगळ्यात एक महिला रणबीरच्या आयुष्यात खबरी बनून असते. हा पोस्ट क्लायमॅक्स सीन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी टाणताना दिसतो.

पुढील बातम्या