मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brahmastra: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' होणार ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या कुठे आणि कधी

Brahmastra: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' होणार ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या कुठे आणि कधी

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 29, 2022, 05:34 PM IST

    • Brahmastra OTT Release: 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे
ब्रह्मास्त्र (HT)

Brahmastra OTT Release: 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे

    • Brahmastra OTT Release: 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला. चित्रपटाने जगभरात ४०० कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठ्या रक्कमेत विकले आहेत. हा चित्रपट डिस्नेप्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण अद्याप प्रदर्शनाची तारखी समोर आलेली नाही. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा : 'पोन्नियिन सेलवन' प्रदर्शनापूर्वी थिएटर मालकाला धमकी

दिग्दर्शक अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ट्विटरवर बॉयकॉट ट्रेंड सुरु होता. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड ब्रेक केले.

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग

पुढील बातम्या