मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अजय देवगण- सुदीप किच्चा वादात राम गोपाल वर्माची उडी, 'बॉलिवूड स्टार...'

अजय देवगण- सुदीप किच्चा वादात राम गोपाल वर्माची उडी, 'बॉलिवूड स्टार...'

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 28, 2022, 09:53 AM IST

    • 'आता हिंदी राष्ट्रभाषा राहिली नाहीये' या सुदीपच्या ट्वीटवर अजयने संतप्त प्रतिक्रिया दिली होती
अजय देवगण आणि राम गोपाल वर्मा (HT)

'आता हिंदी राष्ट्रभाषा राहिली नाहीये' या सुदीपच्या ट्वीटवर अजयने संतप्त प्रतिक्रिया दिली होती

    • 'आता हिंदी राष्ट्रभाषा राहिली नाहीये' या सुदीपच्या ट्वीटवर अजयने संतप्त प्रतिक्रिया दिली होती

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला सर्वत्र पाहायला मिळतो. अशातच बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेता सुदीप किच्चा यांच्यामध्ये ट्विटरवर वाद झाल्याचे पाहायला मिळाले. 'आता हिंदी राष्ट्रभाषा राहिली नाहीये' या सुदीपच्या ट्वीटवर अजयने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, अजय आणि सुदीपच्या भांडणामध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्माने उडी घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

राम गोपाल वर्माने सुदीप किच्चाला पाठिंबा दिला आहे. एका ट्वीटमध्ये सुदीपने 'मी हिंदी भाषा शिकत आहे. मी या भाषेचा आदरही करतो. पण जर हे ट्वीट कन्नडमध्ये असते तर काय झाले असते?' या आशयाचे ट्वीट केले होते. हे ट्वीट राम गोपाल वर्माने रिट्वीट केले आहे.

<p>राम गोपाल वर्मा ट्वीट</p>

'तुझ्या या प्रश्नापेक्षा तू उचललेल्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवे. जर तू अजय देवगणच्या हिंदी ट्वीटचे कन्नडमध्ये उत्तर दिले असते तर... तुझी प्रशंसा केली गेली असती. मला आशा आहे की सर्वांना कळाले असेल की कोणीही इथे नॉर्थ साऊथ नाहीये. भारत हा एक देश आहे' या आशयाचे ट्वीट राम गोपाल वर्माने केले.

<p>राम गोपाल वर्मा&nbsp;</p>

त्यानंतर राम गोपाल वर्माने अजय देवगणच्या ट्वीटला देखील उत्तर दिले. त्याने उत्तर अजय देवगणला सुनावले आहे. 'माझा यावर विश्वास आहे. मी तुला गेल्या काही वर्षांपासून ओळखतो. मला माहिती आहे की तुझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे' या आशयाचे ट्वीट केले.

<p>राम गोपाल वर्मा</p>

त्यापाठोपाठ त्यांने आणखी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांने सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर आल्याचे म्हटले आहे. 'बॉलिवूड कलाकार हे साउथ कलाकारांवर जळतात. कारण कन्नड फिल्म KGF ने ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे' या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

पुढील बातम्या