मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakshabandhan 2022: क्रिती सेनॉन ते भूमी, आपल्या बहिणींना प्रत्येक वर्षी राखी बांधतात या अभिनेत्री

Rakshabandhan 2022: क्रिती सेनॉन ते भूमी, आपल्या बहिणींना प्रत्येक वर्षी राखी बांधतात या अभिनेत्री

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 10, 2022, 08:01 PM IST

  • (bollywood actresses rakshabandhan)बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांना भाऊ नसल्याने त्या आपल्या बहिणींना राखी बांधतात आणि त्यांच्याकडून राखी बांधून घेतात.

आपल्या बहिणींना प्रत्येक वर्षी राखी बांधतात या अभिनेत्री

(bollywood actresses rakshabandhan)बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांना भाऊ नसल्याने त्या आपल्या बहिणींना राखी बांधतात आणि त्यांच्याकडून राखी बांधून घेतात.

  • (bollywood actresses rakshabandhan)बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांना भाऊ नसल्याने त्या आपल्या बहिणींना राखी बांधतात आणि त्यांच्याकडून राखी बांधून घेतात.

actresses ties rakhi to sisters) रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचं अतूट प्रेम आणखी दृढ करण्याचा दिवस. या दिवशी बहीण राखी बांधून भावांकडून तिचे रक्षण करण्याचं वचन घेते. परंतु, बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांना भाऊ नाही आणि त्या आपल्या बहिणीसोबत हा सण मोठ्या प्रेमाने साजरा करतात. या अभिनेत्री दरवर्षी त्यांच्या बहिणीला राखी बांधतात आणि स्वतःही त्यांच्याकडून राखी बांधून घेतात. चला तर मग पाहूया अशा खास बहिणींच्या जोड्या.

ट्रेंडिंग न्यूज

ओठ सुजले अन् चेहराही बिघडला; छोट्या पडद्यावरच्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला पाहून सगळ्यांनाच बसला धक्का!

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

क्रिती सेनॉन

<p>क्रिती सेनॉन- &nbsp;नुपूर सेनॉन</p>

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन तिची बहीण नुपूर सेनॉनसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करते. दरवर्षी क्रिती नुपूरसोबतचे राखीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते. क्रितीने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, तर नुपूर अक्षय कुमारसोबत बी प्राकच्या म्युझिक व्हिडिओ 'फिलहाल'मध्ये दिसली होती. त्याचबरोबर ती लवकरच 'नूरानी चेहरा' मधून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

भूमी पेडणेकर

<p>भूमी पेडणेकर- समिक्षा पेडणेकर</p>

भूमी पेडणेकरच्या धाकट्या बहिणीचं नाव समिक्षा पेडणेकर असून तीही सौंदर्याच्या बाबतीत तिच्या बहिणीपेक्षा कमी नाही. व्यवसायाने वकील असणारी समिक्षा भूमीच्या खूप जवळ आहे. भूमी दरवर्षी तिच्या बहिणीला आणि आईला राखी बांधते आणि नंतर ती त्यांच्याकडून राखी बांधून घेते. बहिण फक्त भावाच्याच मनगटावर राखी बांधू शकते या संकल्पनेवर आपला विश्वास नसल्याचं भूमी सांगते. हा सण आपल्या प्रियजनांच्या रक्षणासाठी आहे.

तापसी पन्नू

<p>तापसी पन्नू- शगुन पन्नू</p>

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला भाऊ नाही. त्यामुळे तापसी आपली बहीण शगुन पन्नूसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करते. तापसी अनेकदा शगुनसोबत ट्रीपला जाते आणि तिचे फोटोही शेअर करत असते. शगुन २००६ मध्ये मिस इंडिया फायनलिस्ट देखील होती आणि सध्या ती एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते ज्यामध्ये तापसी देखील भागीदार आहे.

जरिन खान

<p>जरीन खान</p>

जरीन खानला स्वतःचा भाऊ नाही, म्हणून ती तिच्या धाकट्या बहिणीकडून राखी बांधून घेते. जरीनने पोस्ट शेअर करत लिहिलं की, आम्हाला भाऊ नाही, फक्त आम्ही दोन बहिणी आहोत. म्हणूनच दरवर्षी माझी धाकटी बहीण मला राखी बांधते. माझ्यासारखी लाडकी बहीण असताना तिला भावाची काय गरज आहे'

पुढील बातम्या