मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raj Thackeray: “माझ्यावर बायोपिक आला तर…” राज ठाकरेंच्या वक्तव्यावर तेजस्विनी पंडितला हसू अनावर

Raj Thackeray: “माझ्यावर बायोपिक आला तर…” राज ठाकरेंच्या वक्तव्यावर तेजस्विनी पंडितला हसू अनावर

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 22, 2022, 12:16 PM IST

    • Athang Trailer launch: एका सीरिजच्या ट्रेलर लाँच इवेंटमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राज ठाकरे (HT)

Athang Trailer launch: एका सीरिजच्या ट्रेलर लाँच इवेंटमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    • Athang Trailer launch: एका सीरिजच्या ट्रेलर लाँच इवेंटमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या सर्वत्र 'अथांग' या मराठी वेब सीरिची चर्चा रंगली आहे. या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये ट्रेलरबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आता या सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. दरम्यान, अथांग या सीरिजची निर्माती, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. तिने राज ठाकरे यांना त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाविषयी विचारताच त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात तेजस्विनीने राज ठाकरे यांना, “तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एवढा ड्रामा आहे, त्यात राजकारण आहे, लव्हस्टोरी आणि आयुष्यातले इतर चढउतार आहेत तर मग तुमच्यावर जर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली पाहायला तुम्हाला आवडेल?” असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांनाच हसू अनावर झाले.
वाचा: ऋषभ पंत-उर्वशीमध्ये काय नातं? शुभमनने सांगितलं सिक्रेट

राज ठाकरे यांनी उत्तर देत म्हटले की, “मला घरी जाऊन पहिलं बायकोला विचारावं लागेल, तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. मी पूर्वी जेव्हा सलूनमध्ये जायचो तेव्हा आजूबाजूला असलेल्या लोकांना पाहायचो आणि ते जेव्हा आरशात पाहायचे तेव्हा त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबद्दल काही कल्पना असायच्या. तसं मला स्वतः कसा दिसतो हे आरसा सोडला तर मला माहीत नाही. त्यामुळे ती भूमिका कोण करू शकेल हे मला माहीत नाही.” ते ऐकून तेजस्विनीला हसू अनावर झाले.

विभाग

पुढील बातम्या