मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pradeep Patwardhan Death: टायमिंगचा बादशाह गेला! ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Pradeep Patwardhan Death: टायमिंगचा बादशाह गेला! ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 09, 2022, 10:09 AM IST

    • Pradeep Patwardhan Death: लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनामुळं सिनेनाट्यसृष्टीत शोककळा पसरली आहे.
प्रदीप पटवर्धन (HT)

Pradeep Patwardhan Death: लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनामुळं सिनेनाट्यसृष्टीत शोककळा पसरली आहे.

    • Pradeep Patwardhan Death: लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनामुळं सिनेनाट्यसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. मुंबईतील गिरगाव येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते. त्यांनी आजवर अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

प्रदीप पटवर्धन यांनी 'एक फूल चार हाफ', 'डान्स पार्टी', 'गरम मसाला', 'जमलं हो जमलं', 'नवरा माझा नवसाचा', 'करायला गेलो एक', 'दिली सुपारी बायकोची', 'एक शोध', 'नवरा माझा भवरा', 'लावू का लाथ', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट', 'पोलिस लाईन', '१२३४' आणि इतर काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्यांनी 'हे मन बावरे', 'अवघाची हा संसार' या मालिकांमध्ये काम केले. तसेच त्यांनी रंगभूमी गाजवली होती. त्यांचे 'मोरुची मावशी' हे नाटक विशेष गाजले होते. त्यानंतर त्यांनी काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

प्रदीप पटवर्धन हे गिरगावमध्ये राहात होते. त्यांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अनेक एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतला होता. मराठी रंगभूमीवरील अतिशय विनोदी कलाकार म्हणून ते ओळखले जात होते. तसेच त्यांना टायमिंगचा बादशाह असे देखील म्हटले जात होते.

विभाग

पुढील बातम्या