मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adipurush: चित्रपट आहे की कार्टून; व्हीएफएक्समुळे ‘आदिपुरुष’ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Adipurush: चित्रपट आहे की कार्टून; व्हीएफएक्समुळे ‘आदिपुरुष’ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 03, 2022, 12:41 PM IST

    • Prabhas Movie: काही नेटकऱ्यांनी आदिपुरुष चित्रपटाची ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या जपानी चित्रपटाशी तुलना केली आहे.
आदिपुरुष (HT)

Prabhas Movie: काही नेटकऱ्यांनी आदिपुरुष चित्रपटाची ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या जपानी चित्रपटाशी तुलना केली आहे.

    • Prabhas Movie: काही नेटकऱ्यांनी आदिपुरुष चित्रपटाची ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या जपानी चित्रपटाशी तुलना केली आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'आदिपुरुष.' या चित्रपटाचा टीझर २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. टीझरमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीझरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही यूजरने चित्रपटातील सीन्सची तुलना हॉलिवूड चित्रपटांशी केली आहे. एका यूजरने तर चित्रपटाची तुलना तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रामायण: द लेजेन्ड ऑफ प्रिन्स राम’ या जपानी अ‍ॅनिमेटेड चित्रपटाशी केली. दुसऱ्या एका यूजरने रामानंद सागर यांची रामायण ही मालिका चांगली होती असे म्हणत चित्रपटावर टीका केली आहे. तिसऱ्या एका यूजरने व्हीएफएक्स व्हिडीओ गेमपेक्षा वाईट आहेत असे म्हटले आहे.

या चित्रपटामध्ये प्रभू राम यांच्या भूमिकेत आहे. क्रिती सेनॉनने जानकीची, तर सैफ अली खानने लंकेशची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याशिवाय देवदत्त नागे या मराठमोळ्या अभिनेत्याने चित्रपटामध्ये महत्त्वाचे पात्र साकारले आहे.

'आदिपुरुष' चित्रपटात मोठ्या प्रमाणावर विएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच टीझरमध्ये काही मराठी कलाकार देखील असल्याचे दिसत आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी केली आहे.

विभाग

पुढील बातम्या