मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Collection: आता ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड मोडणार ‘पठाण’! ३४व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

Pathaan Collection: आता ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड मोडणार ‘पठाण’! ३४व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

Feb 28, 2023, 02:44 PM IST

  • Pathaan Box Office Collection: 'पठाण' हा चित्रपट रिलीज होऊन आत तब्बल एक महिना उलटून गेला आहे. मात्र, आजही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Pathaan Box Office Collection

Pathaan Box Office Collection: 'पठाण' हा चित्रपट रिलीज होऊन आत तब्बल एक महिना उलटून गेला आहे. मात्र, आजही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

  • Pathaan Box Office Collection: 'पठाण' हा चित्रपट रिलीज होऊन आत तब्बल एक महिना उलटून गेला आहे. मात्र, आजही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Pathaan Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'पठाण' हा चित्रपट रिलीज होऊन आत तब्बल एक महिना उलटून गेला आहे. आजही ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. जवळपास महिनाभरानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. आता ३४व्या दिवशी देखील या चित्रपटाची कमाई कोटींच्या घरात आहे. तर, लवकरच हा चित्रपट ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड मोडणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला', सखी गोखलने व्यक्त केल्या स्पष्ट भावन

गेल्या महिनाभरापासून ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच ‘शहजादा’, ‘अँट मॅन’, ‘द वास्प क्वांटुमनिया’ आणि ‘सेल्फी’सारखे मोठे चित्रपट रिलीज झाले. पण, यापैकी कोणत्याही चित्रपटाचा ‘पठाण’च्या कमाईवर विशेष प्रभाव टाकू शकलेला नाही. या उलट ‘पठाण’च या चित्रपटांवर भारी पडला आहे.

‘पठाण’चे एकूण कलेक्शन आता ५२६.४१ कोटींवर पोहोचले आहे. जगभरात या चित्रपटाने एक हजार कोटींचा जादुई आकडा आधीच पार केला आहे. ‘पठाण’च्या हिंदी व्हर्जनने रविवारपर्यंत ५०७.६० कोटींचा व्यवसाय केला होता. आता त्याची कमाई ५०८.४५ कोटी रुपये झाली आहे. अवघ्या ३ कोटींच्या कमाईनंतर ‘पठाण’ हा चित्रपट ‘बाहुबली २’चा विक्रम मोडीत काढणार आहे. ‘बाहुबली २’च्या हिंदी व्हर्जनने ५११ कोटींची कमाई केली होती.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा हाय अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट गेल्या महिन्यात २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला दमदार ओपनिंगही मिळाली होती. ‘पठाण’मध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. दीपिका पदुकोणनेही या चित्रपटात अॅक्शन सीन्स केले आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खानही कॅमिओ भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाने जगभरात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या टप्प्यात १००० कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

पुढील बातम्या