मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: शाहरुखचा धमाका! 'पठाण' ठरला ५०० कोटी कमावणारा पहिला बॉलिवूडपट

Pathaan: शाहरुखचा धमाका! 'पठाण' ठरला ५०० कोटी कमावणारा पहिला बॉलिवूडपट

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 16, 2023, 11:24 AM IST

  • Pathaan Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

पठाण (HT)

Pathaan Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

  • Pathaan Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. वीकेंडच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कल्ला करणारा हा चित्रपट आठवडाभर देखील आपली जादू दाखवत आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २२व्या दिवशी ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला', सखी गोखलने व्यक्त केल्या स्पष्ट भावन

शाहरुखच्या पठाण चित्रपटाने २१व्या दिवशी ४९८.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. २२व्या दिवशी चित्रपटाने ४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपट ५०० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये पोहोचला आहे. चित्रपट आता बाहुबली २ची कमाई ५११ कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
वाचा: काय? पुरुषांच्या अंतर्वस्त्रांच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री पाहा व्हिडीओ

परदेशातही ‘पठाण’ थिएटर गाजवत आहे. या चित्रपटाचे वर्ल्डवाईड कलेक्शन देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार’पठाण’ या चित्रपटाने जगभरात तब्बल ९५० कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये काही बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकणार आहे. ‘पठाण’ अद्याप ‘दंगल’ (२००० कोटी), ‘आरआरआर’ (१८१० कोटी), ‘बजरंगी भाईजान’ (९६९ कोटी) आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ (९६६ कोटी) या चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे.

आता काहीच दिवसांत हा चित्रपट वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये १००० कोटींचा टप्पा पार करणार आहे. म्हणजेच हा चित्रपट आता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ (९६९ कोटी) आणि आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ (९६६ कोटी) या चित्रपटांना मागे टाकणार आहे.

पुढील बातम्या