मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Panchak movie Trailer: आता कोणाचो नंबर?; माधुरी दीक्षितच्या 'पंचक' सिनेमाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

Panchak movie Trailer: आता कोणाचो नंबर?; माधुरी दीक्षितच्या 'पंचक' सिनेमाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 12, 2023, 08:11 PM IST

    • Panchak movie Trailer is out: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा 'चंपक' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Panchak movie Trailer is out

Panchak movie Trailer is out: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा 'चंपक' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

    • Panchak movie Trailer is out: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा 'चंपक' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

सध्या 'पंचक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी केली असल्यामुळे सर्वांचे लक्ष चित्रपटाकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यापाठोपाठ आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

चंपक चित्रपटाच्या २ मिनिटे ११ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार? हे बघताना मजा येणार आहे. एकंदरीत चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: 'या' अभिनेत्रीमुळे बदलले होते दिलीप कुमार यांचे आयुष्य

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

पुढील बातम्या