मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Palak Tiwari : श्वेता तिवारीच्या लेकीची मोठी झेप; संजय दत्तसोबत मुख्य भूमिकेत झळकणार पलक तिवारी

Palak Tiwari : श्वेता तिवारीच्या लेकीची मोठी झेप; संजय दत्तसोबत मुख्य भूमिकेत झळकणार पलक तिवारी

Nov 03, 2022, 02:23 PM IST

  • Palak Tiwari : अजून एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसतानाही आता पलक तिवारीच्या हातात आणखी एक मोठा चित्रपट आला आहे.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी

Palak Tiwari : अजून एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसतानाही आता पलक तिवारीच्या हातात आणखी एक मोठा चित्रपट आला आहे.

  • Palak Tiwari : अजून एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसतानाही आता पलक तिवारीच्या हातात आणखी एक मोठा चित्रपट आला आहे.

Palak Tiwari: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) तिच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात पलक तिवारी सलमान खानसोबत झळकणार आहे. या चित्रपटाशिवाय पलक तिवारी 'रोजी: द सॅफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातही दिसणार आहे. अजून एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसतानाही आता पलक तिवारीच्या हातात आणखी एक मोठा चित्रपट आला आहे. या चित्रपटात पलक तिवारी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसोबत (Sanjay Dutt) स्क्रीन शेअर करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

'रोजी: द सेफ्रॉन चॅप्टर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली पलक सध्या सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. दरम्यान, संजय दत्तच्या चित्रपटातही पलक तिवारीची वर्णी लागली आहे. पलक तिवारी 'द व्हर्जिन ट्री' (The Virgin Tree) या चित्रपटात संजय दत्तसोबत झळकणार आहे. पलक तिवारीच्या बॉलिवूड करिअरमधला हा तिसरा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात पलक तिवारीसोबत सनी सिंह (Sunny Singh) आणि मौनी राय (Mouni Roy) देखील दिसणार आहेत.

कॉमेडी आणि हॉररचा मिलाफ असणारी कथा

वनुक्ष अरोरा आणि सिद्धांत सचदेवा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत सचदेवा करणार आहेत. चित्रपटात संजय दत्तसह अभिनेता सनी सिंह, अभिनेत्री मौनी रॉय, पलक तिवारी, आसिफ खान हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. संजय दत्तने या चित्रपटाविषयी बोलताना म्हटले की, ‘मी ज्या चित्रपटाच्या शोधात होतो, तो हाच चित्रपट आहे. या चित्रपटात कॉमेडी आणि हॉररचा उत्तम मिलाफ दिसणार आहे. सोबत थ्रिलही असणार आहे.’

संजय दत्त दिसणार हटके लूकमध्ये!

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि पलक तिवारीने या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाशी संबंधित काही सीन्स दिसत आहेत. तर, व्हिडीओच्या शेवटी संजय दत्तचा या चित्रपटातील लूक दिसत आहे. संजय दत्त आणि पलक तिवारी या चित्रपटात एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहेत.

पदार्पणाआधीच पलकची हवा

एकीकडे आई श्वेता तिवारी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत असताना, तिची लेक अर्थात पलक तिवारी देखील मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी पलक तीअव्री आपले फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते. अद्याप एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसतानाही तिची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. याचमुळे तिच्या हाती बॉलिवूडचे मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत.

विभाग

पुढील बातम्या