मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nitesh Rane: बेबी पेंग्विन आता दूर राहिला नाही; नितेश राणेंनी शेअर केला रुपकुमार शाह यांचा व्हिडीओ

Nitesh Rane: बेबी पेंग्विन आता दूर राहिला नाही; नितेश राणेंनी शेअर केला रुपकुमार शाह यांचा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 02, 2023, 12:57 PM IST

  • Sushant Singh Rajput: कूपर रुग्णालयातील रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या आहे असा दावा केला होता. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. आता नितेश राणे यांनी व्हिडीओ शेअर करत मोठा खुलासा केला आहे.

नितेश राणे (HT)

Sushant Singh Rajput: कूपर रुग्णालयातील रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या आहे असा दावा केला होता. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. आता नितेश राणे यांनी व्हिडीओ शेअर करत मोठा खुलासा केला आहे.

  • Sushant Singh Rajput: कूपर रुग्णालयातील रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या आहे असा दावा केला होता. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. आता नितेश राणे यांनी व्हिडीओ शेअर करत मोठा खुलासा केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ कॉल आल्याचे लोकसभेत सांगितले. ‘AU’ म्हणजे आदित्य ठाकरे, असा दावा राहुल शेवाळेंनी केला. त्यापाठापोठा कूपर रुग्णालयात सुशांतच्या पोस्टमॉर्टनच्या वेळी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्याने धक्कादायक खुलासा केला. त्यानंतर रुपकुमार शाह तेथे खरच उपस्थित होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता भाजप आमदार नितेश राणे यांनी रुपकुमार शाह यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

नितेश राणे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर रुपकुमार शाह यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपकुमार हे सुशांतची डेडबॉडी घेऊन जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, 'सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह हा रुपकुमार शाह हे घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. पोस्टमॉर्टनच्या वेळी ते उपस्थित होते. लवकरच सत्य समोर येईल. आता बेबी पेंग्विन दूर राहिला नाही. लवकरच न्याय मिळेल' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: “वो मुझे भी नहीं छोड़ेंगे…”, सुशांतसोबतचा फोटो शेअर करत विवेक अग्निहोत्रीने केले ट्वीट

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जुन २०२० रोजी वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा देह पंख्याला टांगलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यानंतर सुशांतने आत्महत्या केली हे सांगण्यात आले होते. आता कूपर रुग्णालयातील कर्मचारी रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या असे म्हटल्यानंतर या प्रकरणाने वेगळे घेतले आहे.

विभाग

पुढील बातम्या