मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chowk: महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट पाहायला मिळणार 'चौक' चित्रपटात

Chowk: महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट पाहायला मिळणार 'चौक' चित्रपटात

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 16, 2023, 02:41 PM IST

    • Chowk Movie Poster: चौक चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर सध्या चर्चेत आहे.
चौक (HT)

Chowk Movie Poster: चौक चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर सध्या चर्चेत आहे.

    • Chowk Movie Poster: चौक चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर सध्या चर्चेत आहे.

चौक... चौक म्हणलं की आठवतो तो चौकातल्या मंडळींचा गलका, येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ, चौकातल्या काका, मामा, दादांचे किस्से, वाद आणि असं बरंच काही... अशाच एका चौकाची गोष्ट आपल्यासमोर घेऊन येत आहेत अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया. आज या चित्रपटाची पहिली झलक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली.

ट्रेंडिंग न्यूज

ओठ सुजले अन् चेहराही बिघडला; छोट्या पडद्यावरच्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला पाहून सगळ्यांनाच बसला धक्का!

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

‘चौक’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. या पोस्टरमध्ये, चौकात सूचना, सुविचार लिहिण्यासाठी असलेला फळा दिसतोय. दोस्ती ग्रुप, पुणे यांच्या या फळ्यावर मोठ्या अक्षरात ‘चौक’ दिसतंय. अनुराधा प्रॉडक्शन आणि निर्माते दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) प्रस्तुत ‘चौक’ चित्रपटात महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट आहे, असा अंदाज बांधला जातोय. अद्याप या चित्रपटाच्या तारखेची घोषणा झालेली नसून हा चित्रपट नक्की कधी रिलीज होतोय, याची उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटात कोण कलाकार असतील, चौक म्हणजे नक्की कशासंदर्भात कथा असेल, याचेही तर्क बांधले जात आहेत.

‘चौक’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे असून या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी त्यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

विभाग

पुढील बातम्या