मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Har Har Mahadev Movie: ‘हर हर महादेव’ चित्रपटावर अमोल मिटकरींचा आक्षेप, म्हणाले...

Har Har Mahadev Movie: ‘हर हर महादेव’ चित्रपटावर अमोल मिटकरींचा आक्षेप, म्हणाले...

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 31, 2022, 02:33 PM IST

    • Amol Mitkari: अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आक्षेप घेतला आहे
हर हर महादेव (HT)

Amol Mitkari: अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आक्षेप घेतला आहे

    • Amol Mitkari: अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आक्षेप घेतला आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी, लढायांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या जगभरातील लोकांना प्रेरित केले. यापैकीच एक महत्वाची घटना म्हणजे पावनखिंडीतील लढाई. या लढाईमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असलेल्या धैर्यवान अशा बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासह असणाऱ्या मावळ्यांची प्रचिती शत्रूला आली. याच घटनेवर आधारित 'हर हर महादेव' हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

अभिजीत देशपांडे लिखित, दिग्दर्शित 'हर हर महादेव'ची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सची असून यात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अमोल मिटकरी यांनी नुकतंच एक ट्वीट करत आक्षेप घेतला आहे. चित्रपटात दाखवलेली अनेक दृश्य ही इतिहासाला धरुन नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
वाचा: लोक मला आहे तशी स्विकारतील का?; ए आर रहमानच्या मुलीचा पोस्ट चर्चेत

“VFX तंत्रज्ञानाचा अतिवापर “हर हर महादेव”या चित्रपटात जाणवला. सुबोध भावे यांनी साकारलेली “छ.शिवरायांची ” भुमिका (अभिनय छान असला तरीही ) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. श्री राज ठाकरे यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते”, असे ट्वीट अमोल मिटकरींनी केले आहे.

आणखी एक ट्वीट करत ते म्हणाले, “अफजल खानाचा कोथळा काढतांना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्त्राव वा सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही. बाजीप्रभु यांची शब्दफेक व जेधे _ बांदल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही.”

विभाग

पुढील बातम्या