मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या पत्नी विरोधात आईनेच केली तक्रार, चौकशीसाठी पोलिसात हजर

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या पत्नी विरोधात आईनेच केली तक्रार, चौकशीसाठी पोलिसात हजर

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 23, 2023, 11:07 PM IST

    • Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुन्निसा यांनी सूने विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नवाजुद्दीनच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले आहे.
नवाजुद्दीन (HT)

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुन्निसा यांनी सूने विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नवाजुद्दीनच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले आहे.

    • Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुन्निसा यांनी सूने विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नवाजुद्दीनच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा सतत त्याच्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुन्निसा सिद्दीकी यांनी सूनेविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी नवाजच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून सासू आणि सून या दोघींमध्ये प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्यामुळे नवाजुद्दीनच्या आईने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारमध्ये नवाजच्या आईने आलियावर आरोप केले आहेत की रविवारी जेव्हा त्या एकट्या घरी होत्या तेव्हा धक्काबुक्की केली. जबरदस्ती बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. याबाबत मेहरुन्निसाने पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर तक्रार दाखल केली. आता आलियाला चौकशीसाठी बोलावल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: हाई झुमकावाली पोरं... चिमुरडी पोरं काय नाचली राव! गाणं बंद केल्यावरच सर्व शांत झाले

नवाजुद्दीन आणि जैनब उर्फ आलिया यांचा २०१० साली विवाह झाला. २०११मध्ये त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर काही दिवसांमध्ये नावज आणि आलियाने घटस्फोट घेतला. २०१४मध्ये पुन्हा ते दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. पुन्हा पाच-सहा महिने एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरु झाले. याच दरम्यान आलिया पुन्हा प्रेग्नंट होती.

विभाग

पुढील बातम्या