मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Samantha Ruth Prabhu: समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य ‘या’ अभिनेत्रीशी करणार लग्न?

Samantha Ruth Prabhu: समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य ‘या’ अभिनेत्रीशी करणार लग्न?

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 29, 2023, 12:36 PM IST

  • Naga Chaitanya: गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता त्यांचा एक फोटो व्हायरल झाल्यामुळे लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

नागा चैतन्य

Naga Chaitanya: गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता त्यांचा एक फोटो व्हायरल झाल्यामुळे लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

  • Naga Chaitanya: गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता त्यांचा एक फोटो व्हायरल झाल्यामुळे लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते कपल अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता नागा चैतन्य पुन्हा लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

२०२१मध्ये नागा चैतन्य पत्नी समांथा पासून विभक्त झाला होता. त्यानंतर वर्ष भरातच तो अभिनेत्री शोभिताला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यांचे एकत्र फिरतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्या दोघांनी कधीही प्रेमाची कबूली दिली नाही किंवा उघडपणे यावर बोलणे टाळले.
वाचा: हास्याचा चौकार!! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता चार दिवस

शोभिता

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये नागा चैतन्य एका रेस्टॉरंटमधील शेफसोबत पोझ देताना दिसत आहे. या फोटोच्या बँकग्राऊंडमध्ये त्याच्यासोबत शोभिता धुलिपा दिसत आहे. तिने फोटो दरम्यान चेहऱ्यावर हात ठेवला आहे. या फोटोवरुन ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शेफ सुरेंद्र मोहनने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नागा चैतन्यसोबतचा फोटो शेअर केला आहे. पण फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट करुन टाकली. मात्र या पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला आहे. अनेकजण नागा चैतन्य आणि शोभिताच्या नात्यावर प्रश्न विचारताना दिसत आहेत.

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

पुढील बातम्या