मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Naga Chaitanya:माझ्यासारखा मूर्खपणा करू नका! लग्नाच्या तारखेच्या टॅटूवरून चैतन्याचा चाहत्यांना सल्ला

Naga Chaitanya:माझ्यासारखा मूर्खपणा करू नका! लग्नाच्या तारखेच्या टॅटूवरून चैतन्याचा चाहत्यांना सल्ला

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 09, 2022, 05:36 PM IST

    • (naga chaitanya hand tattoo) नागा चैतन्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाला त्याला चाहत्यांनी त्याच्या या गोष्टीचं अनुकरण केलेलं आवडत नाही. त्याच्या हातावर सामंथा आणि त्याच्या लग्नाची तारीख गोंदवलेली आहे.
नागा चैतन्या

(naga chaitanya hand tattoo) नागा चैतन्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाला त्याला चाहत्यांनी त्याच्या या गोष्टीचं अनुकरण केलेलं आवडत नाही. त्याच्या हातावर सामंथा आणि त्याच्या लग्नाची तारीख गोंदवलेली आहे.

    • (naga chaitanya hand tattoo) नागा चैतन्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाला त्याला चाहत्यांनी त्याच्या या गोष्टीचं अनुकरण केलेलं आवडत नाही. त्याच्या हातावर सामंथा आणि त्याच्या लग्नाची तारीख गोंदवलेली आहे.

(naga chaitanya samantha wedding date) दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्या त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. नुकताच त्याने त्याच्या हातावरील एका टॅटूचा अर्थ सांगितला आणि चाहत्यांना देखील त्याच्या टॅटूचं अनुकरण न करण्याची विनंती केली. हा टॅटू म्हणजे त्याच्या आणि अभिनेत्री सामंथा यांच्या लग्नाची तारीख आहे. पण तो मॉर्स कोडमध्ये लिहिलेली आहे. सोबतच त्याने हा टॅटू काढून टाकण्याचा कधीही विचार केला नसल्याचं म्हटलं.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ताल करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चैतन्याने त्याच्या टॅटू बद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'मी काही चाहत्यांना भेटलो ज्यांनी माझ्या नावाप्रमाणे टॅटू गोंदवले आहे आणि त्यांनी या टॅटूचं अनुकरण केलं आहे. ही अशी गोष्ट नाही ज्याचं तुम्ही अनुकरण कराल. हा टॅटू म्हणजे माझं लग्न झालं तो दिवस. त्यामुळे चाहत्यांनी तो काढून घ्यावा असं मला वाटत नाही. जेव्हा ते या गोष्टी गोंदवून घेतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. गोष्टी बदलू शकतात. तारखाही बदलू शकतात. मी टॅटू बदलू शकतो'. तू टॅटू काढून टाकण्याचा विचार केला आहेस का असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, 'नाही, अजून तरी मी असा विचार केलेला नाही.'

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी जानेवारी २०१७ मध्ये हैदराबादमध्ये धुमधडाक्यात लग्न केलं होतं आणि त्याच वर्षी ६ ऑक्टोबर रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार गोव्यात लग्न केलं. त्यांनी २ ऑक्टोबर २०२१ रोजी एकापोस्टमधून त्यांनी आपण वेगळे होत असल्याची घोषणा केली. चाहत्यांनी यापूर्वी त्याच्या आणि सामंथाच्या लग्नाची तारीख-- ६-१०-१७ म्हणून त्याच्या हाताचा टॅटू डीकोड केला होता.

विभाग

पुढील बातम्या